मातीला पाय जरी लागला तरी ई..ई...ई....! करत ओरडणारी शहरी मुलं मातीला हात लावायला उद्युक्त होतात, माती बरोबर खेळायला तयार होतात, मातीच्या प्रेमात पडतात. मोठी माणसं गतकाळच्या गावच्या आठवणीत रममाण होतात, गृहिणींना काय विकत घेऊ आणि काय नको असं होतं. आकार पॉट आर्ट च्या दालनात प्रवेश केल्या केल्या हे असं घडतं. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग १७ ला लागून असलेल्या तलाशेट, इंदापूर इथे हे आकार पॉट आर्ट चं दालन आणि कार्यालय आहे.
पेण, जवळचच माणगाव ही तर कलाकारंचीच भुमी. गणेश मुर्तींसाठी प्रसिद्ध असलेला इलाखा हळूहळू शहरीकरणाने व्यापून जात असतानाच आणि इथले मुळचे कुंभार आपला व्यवसाय सोडून ऊपजीविकेसाठी इतर व्यवसायात गुंतले असताना राजेश कुलकर्णीनी मातीत हात घातला आणि त्यातून सोनं निर्माण केलं. आपल्या सोबत गावातील दहा-बारा तरूणांना त्या कलेचं बाळकडू पाजून तयार केलं आणि गावातच स्थिरस्थावर केलं. गाव आणि गावच्या मातीमध्ये ते भक्कमपणे उभे आहेत.
‘फिरत्या चाका वरती देशी मातीला आकार’ या गाण्याच्या ओळी सहज ओठावर येतात, पण इथला वेडा कुंभार मात्र परंपरागत कुभार नाही. राजेश कुलकर्णी यांना समोर पाहिल्यावर ते कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारे व्हाइट कॉलर व्यक्ती वाटतात, पण एकदा का ते चाकावर अदाकारी करायला लागले की थक्क व्हायला होतं. बघता बघता समोरची माती पणती, मडकी, चंबू, घडा, नरसाळे असे अनेक आकार घ्यायला लागते, एकीकडे हात चालत असतानाच या कले विषयी ते भरभरून मोकळे पणाने बोलत राहातात, माहिती देत राहातात. समोरच्या मातीच्या गोळ्याला त्यांच्या हाताचा स्पर्श होतो आणि वेगवेगळे आकार साकार होतात, ते पाहून आपण अचंबीत होतो पण ते तेवढ्यावरच थांबत नाहीत, अजून त्यांच्यातील कलाकार पुर्ण सादर झालेला नसतो. ते सर्व आकार एक एक करून हातात घेत त्यांना ते आणखी खुलवतात आणि एक पुर्ण कलाकृती रुप घेते. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा गणनायक, तो गणपती त्या मधून प्रकट होतो. मन समाधी अवस्थेत जातं.
राजेश कुलकर्णी |
इथे गेल्यावर खुप हलकं हलकं वाटलं. ट्रेस मॉनेजमेंट कुठलाही वर्गाला हजेरी न लावताही.
Dear Sir,
ReplyDeleteThanks a lot!!!
ब्लॉग आवडला, लेख आवडला, धन्यवाद !
नेमक्या शब्दांत अचूक वर्णन...
--- राजेश
राजेशजी प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद !
ReplyDelete