असे उत्सव जे वर्षातून एकदा येतात. अनेकदा ते करायचे म्हणून केले जातात. मराठी माणूस तसा उत्सव प्रिय. सदा सर्वदा काहीना काही कारण काढून उत्सव साजरे करणं हा वसाच जणू यांनी उचललेला असतो. आमच्यासाठी मात्र इशा टुर्सचं प्रभादेवीला भरणारं प्रदर्शन म्हणजे वार्षीकोत्सव असतो. तशी यावर्षी डोंबिवली, पुण्याला दोन प्रदर्शनं झाली पण मुबईचं प्रदर्शन म्हणजे महोत्सव असतो. अनेक मित्र जे एरवी फोनवरच भेटतात ते या प्रदर्शना दरम्यान भेटतात. अनेक नव्या ओळखी होतात. तर्हेतर्हेची माणसे भेटतात. काही नमुने ही......असो.
कित्येक जण सहलींकडे आकृष्ट होतात. छायाचित्र पाहाण्यात रममाण होतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. वन्या सहलींचे बेत नक्की होतात. या वेळचं प्रदर्शन नेहमी प्रमाणे लडाखवर नाही तर केनियावर आहे. जशी केनियात पक्षी प्राण्यांची लयलूट आहे तशीच मनोहारी छायाचित्रं या प्रदर्शनात मांडली आहेत. उद्घाटनाचा कार्यक्रम तसा अनौपचारीक असतो.या वर्षी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ छायाचित्रकार अधिक शिरोडकर आपली महत्वाची कामं थांबऊन आवर्जून आले होते. त्यांना निमंत्रण दिलं तेव्हा ते आत्माला म्हणाले एक चांगलं प्रदर्शन रविंद्रला आहे तुम्ही पण या. क्षणभर कळेना हे कुठल्या प्रदर्शना विषयी बोलताहेत? पण आमच्याच प्रदर्शनाची बातमी हिंदुस्तान टाईम्स मध्ये वाचून ते फिरकी घेत होते. प्रत्यक्ष उद्घाटनाला आल्यावरही त्यांचं मिश्कील बोलणं आणि फोटो आणि प्राण्यांबद्दल अभ्यासपुर्ण बोलणं ऎकलं आणि प्रदर्शनाचा श्रीगणेशा तर उत्तम झाला असं मनोमन वाटून गेलं. येता आठवडाभर हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे. जरुर भेट द्या. आनंद घ्या.
वैभव मांगले |
No comments:
Post a Comment