डॉ. राजेंद्र सिंह
मिठी नदी सुध्दा गंगेसारखीच सुंदर होती. प्रत्येक नदीचं आपलं वेगळं सौंदर्य असतं. गंगा, यमुना असो की अन्य कोणतीही नदी, जैविक कचरा पचवण्याची तिची स्वतःची एक ताकद होती. आता माणसाने रसायन आणि धातूंच प्रदुषण केल्याने नदीची ताकद संपुष्टात आली आहे. पहिल्यांदा विचारांचं प्रदुषण दुर झालं पाहीजे. जाणिवपुर्वक प्रयत्न करून पाण्याला समजून त्यांचं संवर्धन केलं पाहीजे. नद्यांशी समाजमन जोडलं गेलं पाहीजे असे उद् गार मँगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ञ डॉ. रजेंद्र सिंह यानी काढले. ' गंगाजल फौंडेशन' च्या राष्ट्रीय परितोषक वितरण समरंभात ते बोलत होते. १४४ नद्यांच्या खोर्यात प्रवास करून त्यांचा अभ्यास करताना आलेल्या अनुभवांचं कथन करत त्यांनी अनेक समस्यांवर प्रकाश टाकला.
गंगाजल फौंडेशनचं चित्र प्रदर्शन पाहून आपण मंत्रमुग्ध झालो अशी प्रतिक्रीया देताना उत्तरेकडून पुर्वेकडे वाहणार्या गंगेची काळजी पश्चिमेकडचं गंगाजल फौडेशन आणि विजय मुडशिंगीकर घेतात म्हणजे गंगा जीवनधारा आहे आणि ती संपुर्ण देशाला एका सुत्रात बांधते याचं प्रतिक आहे असं ते पुढे म्हणाले. या प्रसंगी श्री. अभिजीत घोरपडे यांना गंगाजल फौंडेशनचा ' नदी मित्र " पुरस्कार देण्यात आला.