आज श्रीलंकेच्या खेळाडूंवर तालिबानी अतिरेक्यांनी हल्ला केला, त्याचा आता जगभरातून निषेध होईल. पण जग या प्रवृत्ती विरूध्द एकत्र येणार आहे का ? श्रीलंका तर या विरोधात काही करेल असं वाटत नाही. लिट्टे विरूध्दची लढाई अजुन त्यांना जिंकायची आहे. परंतू जगाला तत्वज्ञानाचे डोस पाजणार्या अमेरीका आणि युरोपीय देशांनी आता कृती करावी. पाकिस्तानाला दिली जाणारी मदत आतिरेकी कारवाया साठी भारताविरूध्द वापरली जातेच, पण आता इतर देशही त्याचे बळी जात आहेत.
क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्या मुंबईवर हल्ला झाला, आता थेट क्रिकेटवरच हल्ल झाला आहे. पाकिस्तान वर बहिष्कार आणि मुंबईत येणं टाकून हे प्रश्न सुटणार नाहीत, तर या प्रवृत्तीचं समुळ उच्चाटन केलं पाहीजे. अतिरेक ही वृत्ती आहे त्या विरूध्द आता संपुर्ण जगानेच आवाज उठवणं जरुरीचं आहे.
लेखकः नरेंद्र प्रभू
No comments:
Post a Comment