skip to main |
skip to sidebar
दान मग ते कोणतेही असूदे ते सत्पात्रीच केलं पाहीजे. मतदान हे असे दान आहे की ते रोज करता येत नाही. पाच वर्षांनी किंवा कधी कधी राजकीय नाकर्तेपणा, खोडसाळपणा, स्वार्थी राजकारण या मुळे मुदतपुर्व हे दान करावं लागतं. पारतंत्र्यातील जुलूम-जबरदस्ती, हाल अपेष्टा, आणि मुख्य म्हणजे मानहानी पाहता स्वातंत्र्याची किंमत कळते. लोकशाहीची जपणूक आपण योग्य प्रकारे करत नाही. लोकसभेत आपणच निवडून दिलेले खासदार असभ्य वर्तन करताना, गोंधळ घालताना दिसतात. भ्रष्ट, गुन्हेगार प्रवृत्तीची व्यक्ती आता तरी निवडून देता नये. खासदारकी ही कुणाची मिरासदारी ठरू नये. निवृत्तीचं वय राजकारणी मंडळींना नाही, आता ते आपणच ठरवून त्यांना निवृत्त केलं पाहीजे.
नरेंद्र प्रभू
No comments:
Post a Comment