03 March, 2009

श्रीलंकेच्या खेळाडूंवर तालिबानी अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या निमीत्ताने

" युद्धाची परिस्थिती आहे, दहशतवाद आहे आणि हिंसाचार दिसतो आहे. आपले अर्थकारण दुबळे झाले आहे. हावरटपणा आणि बेजबाबदार वर्तनामुळे तर ही वेळ आली आहेच; पण नव्या काळातील नवा देश घडविण्यात आलेल्या सामूहिक अपयशाचा देखील तो परिपाक आहे. आमची घरे गेली आहेत, रोजगार हिरावून घेतले जात आहेत, उद्योगधंदे बंद पडत आहेत. आमची आरोग्य व्यवस्था महागडी आहे, आमच्या शाळा उदार नाहीत. ज्या पद्धतीने आपण वागतो आहोत त्यामुळे आपण वसुंधरेलाच रोज इजा पोहोचवत आहोत. हे सारे पेचप्रसंगाचे निदर्शक आहेत. यामुळे एक भीती निर्माण झाली आहे. “ हे वर्णन भारताचे नाही, चमकलात ना ? हो ! हे आहे अमेरिकेचे वर्णन. शपथ घेतल्यावर बराक ओबामांनी आपल्या भाषणात केलेलं.

जगभरातल्या दहशतवादाला खतपाणी घालणे, तिसर्‍या जगात सतत हस्तक्षेप करणे, अलिप्त देशाना सतत धमकावणे, पाकिस्तानला सर्वप्रकारची मदत करणे, व्हिएतनाम पासून इराक पर्यत युध्द आरंभणे, इस्त्राईलला गाझापट्टीत हल्ले सूरू ठेवण्याची मुभा देणे. आणि एंरॉन पासून बुडवण हि अमेरिकेची नजिकच्या भुतकाळातली कामगिरी.

सतत भोगवादाचीच पुजा करणार्‍या अमेरिकेला आता शास्वतमुल्य आणि परंपरेची आठवण झाली आहे. पैसा असला की हे आठवत नाही, तो गेला की पायाखालची वाळू सरकते, अमेरिकेचं आता तसच झालं आहे. जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्र असलेल्या अमेरिकेला आता गरिबीची भिती वाटत आहे. बराक ओबामांच्या रुपात त्याना आता एक आशेचा किरण दिसत आहे. मनाची श्रीमंती त्यानी दाखवली आहेच, आता कृती पाहूया.

लेखकः नरेंद्र  प्रभू



No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates