‘लडाख प्रवास अजून सुरू आहे’ या पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा.
२६ ऑक्टोबर २०१३. एस. एम. जोशी फाउंडेशन, सभागृह, पुणे, सायंकाळी ६ ते ९
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
पुस्तकावरचे काही अभिप्राय:
अत्यंत भावपुर्ण, प्रेरणादायी आणि दाद देण्याजोगे असे हे प्रवासकथन आहे. या
पुस्तकातून लडाखचं चांगलं दर्शन होतं. – लोकसत्ता.
अतिवृष्टीच्या आपत्तीत सापडलेल्या चमूची चित्तरकथा, एकापेक्षा एक अशा खिळवून ठेवणार्या
घटनांची थरारक मालिकाच या पुस्तकातून उलगडत जाते किंबहूना तुम्हाला थेट भिडते.
पुस्तकाच्या पानातून लडाख प्रांत तुम्हाला भेटत राहतो. – लोकप्रभा
लडाख वरील हे पुस्तक अतिशय वाचनीय झालेले आहे. प्रतीकूल परिस्थितीत प्रवास कसा
करावा याचीच ही चित्तरकथा आहे. – नवशक्ती
या पुस्तकाने पार झपाटून टाकले. एकदा वाचून समाधान झाले नाही म्हणून पुन्हा
वाचावयास घेतले. संघर्षमय प्रवास नेमका कसा असतो याची अनुभूती लाभली...... सारे
काही थरारक. आपल्यासमवेत अन्य पर्यटकांनाही
लडाख चे प्रेम लावलेत तेही अफलातूनच. मृत्युचे तांडव, पराकोटीची भूक,
ढासळणारे मनोधैर्य सार्याची प्रचिती मनाला धग ... उत्सुकता लावून गेली. एकदातरी
लडाखला भेट द्यायलाच हवी एवढी उर्मी या पुस्तकाने दिली. आपण लडाख सचेत केला आहे. प्रसिद्ध
समाजसेवक डॉ. विकास आमटे आणि डॉ. सौ. भारती आमटे. वरोरा.
लेखकासोबत प्रत्यक्ष लडाखला फिरत आहे आणि त्या प्रवासाचा मी एक भाग आहे, असं
पुस्तक वाचताना वाटत राहतं. इच्छाशक्ती, श्रद्धा, समर्पण यांचा संगम असलेलं हे
मराठीतलं उत्तम पुस्तक आहे.- ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि माजी खासदार श्री. अधिक शिरोडकर
हे पुस्तक वाचताना लडाखच्या शौर्य सफरीवर गेल्यासारखे वाटते, हे नुसते प्रवास
वर्णन नसून ते शौर्य, करूणा, प्रेम, अगतिकता, माणूसकी, भाग्य, जिद्द अशा जीवनाच्या
विविध पैलूंना स्पर्श करणारे सुंदर पुष्प आहे.
दीपक जाधव- उपायुक्त, विक्रीकर विभाग, महाराष्ट्र शासन.
पुस्तक हातात घेतताच एका रात्रीत वाचून संपवलं. जीवनाची अशाश्वत: आणि थरार
प्रत्येक पानापानात भेटत राहतो. मराठी साहित्यात एक अमुल्य भर.
डॉ. घ:नशाम बोरकर
No comments:
Post a Comment