कितीक वळणे या
वाटेवर
आठवणींचा होतो
गुंता
कधी पाठीवर हात
तुझा अन
कधी एकटा फिरतो
नुसता
किती माणसे
वळणावरली
तेव्हा तेव्हा
मजला भिडली
मी ही रुजलो
थोडा थोडा
त्यांची माझी
वाट वेगळी
चालत आहे या
वाटेवर
सरळ वाट मज नाही
गमली
वळण पुढे अन मी
मागे रे
गंम्मत वाटे वळणा
पुढली
वळणा पुढती वळण
असे हे
वाटा इथल्या
छोट्या मोठ्या
मी वाटेवर
स्वछंदाने फिरतो आहे
जरी..., रुतला काटा
फिरता फिरता या
वाटेवर
आयुष्याचे गाणे व्हावे
गाता गाता
पुन्हा एकदा
मनात रुजलेले
गवसावे
नरेंद्र प्रभू
No comments:
Post a Comment