30 March, 2016

फ़तेहपुर सीकरी


अकबर बादशहाने राणा सांगाला सीकरी येथे हरवल्यानंतर इथे राजधानी स्थापन केली. १५७१ ते १५८५ एवध्या अल्प काळासाठीच ही राजधानी म्हणून होती. राजधानीला पाणी कमी पडू लागल्याने पुन्हा एकदा आग्र्याच्या लाल किल्ल्यात राजधानी हालवली गेली. फतेहपुर सीकरी हिंदू आणि मुस्लिम वास्‍तुशिल्‍पकलेच्या मिश्रणाचा सर्वात उत्कृष्ट नमुना आहे. फतेहपुर सीकरी मशीद ही  मक्‍काच्या  मशीदीची प्रतिकृती आहे. हिंदू आणि पारसी वास्‍तुशिल्पाच्या डिझाइन वरून ही साकारण्यात आली आहे. ५४ मीटर ऊंच असलेला बुलंद दरवाजा हे मशीदीचं प्रवेश व्दार आहे. मशीदीच्या उत्तरेला शेख सलीम चिश्‍तीचा दरगा आहे जिथे नि:संतान महिला आशिर्वादासाठी येतात. 

वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना पहाण्यासाठी तिथे गेलं पाहिजे.  


बुलंद दरवाजा़


शेख सलीम चिश्‍तीचा दरगा











दीवान्-ए-खास चा केंद्रीय स्तंभ


ताज महाल


अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा ताज महाल पाहून म्हणाले होते जगाची दोन गटात वाटणी करायची झाल्यास ताज महाल पाहिलेले आनि न पाहिलेले अशी करावी लागेल. नुकतेच आम्ही पहिल्या गटात सामिल झालो. ताज महाल खरंच जन्मात एकदा तरी पहायलाच हवा. केवळ अप्रतिम.  

दिवसातून सारखे रंगछटा बदलणारा ताज महाल 

सकाळी सुर्योदाच्या काही मिनिटं आधी या दारातमधून प्रवेश केल तेव्हा मन आनंदून गेलं होतं.   

बरेचशे विदेशी पाहूणे आणि आम्ही ते अद्भूत रुप पहायला असे आतूर झालो होतो.    

सकाळी लवकर इथे गेलं तर हा परिसर थो डा मोकळा असतो. 

सुर्याची पहिल्या कोवळ्या किरणात ताज...
  

आतल्या भितींवर केलेली अप्रतिम कारीगरी  







आता याचं रुप पालटलं. 



29 March, 2016

आग्रा - लाल किल्ला


आग्र्याचा ‘लाल किला’ हा भुईकोट किल्ला भारताच्या आग्रा शहरात आहे. याला जागतिक वारसा स्थळ म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. जगप्रसिद्ध  ताज महाल येथून २.५ किमी अंतरावर आहे.

हिंदुस्थानचे मुघल सम्राट  बाबर, हुमायुं, अकबर, जहांगीर, शाहजहां व औरंगज़ेब यांच इथं वास्तव्य होतं. शाहजहांला औरंगजेबाने इथेच कैदेत ठेवलं होतं आणि त्याचा अंतही इथेच झाला.

यमुनाकाठी असलेला ताज महाल आणि या लाल किल्ल्याचं ही एक नातं आहे.

सुर्यास्तानंतर इथे होणार्‍या लाईट ऍन्ड साऊंड शो  मध्ये सगळा एतिहास कथन केला जातो. किल्ला पहावा असाच आहे.    


वाईड ऍगलमध्येही न मावणारा अवाढव्य आग्रा फोर्ट  

मुख्य प्रवेश व्दारामधून आत आल्यावर दिसणारी सुंदर वास्तू 






पालखी 

लाल किल्ल्यामधून दिसणारा मनोहारी ताज महाल 







किल्ल्याच्या प्रवेशव्दारासमोरचा शिवरायांचा अश्वारुढ पुतळा 


    


27 March, 2016

जयपूर


गुलाबी रंगाचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेलं जयपूर राजस्थानातलं स्वच्छ-सुंदर शहर आहे. पुरातन गड आणि इमारती बर्‍यापैकी राखलेल्या या शहरात त्यांचं सुंदर दर्शन घडतं. राजस्थानच्या या राजधानीत अजूनही हवेल्या शिल्लक आहेत. अशाच एका हवेलीत राहण्याची संधी आम्हाला मिळाली. बर्‍याचशा हवेल्या अशा हॉटेलमध्ये रुपांतरीत करण्यात आल्या आहेत. राजस्थानच्या रजधानीची ही चित्र सफर: 

हॉटेलमध्ये रुपांतरीत करण्यात आलेली हवेली

हवा महल 

जंतर मंतर 


राज महाल 

गेट

नहार गढच्या दिशेने

अंबेर फोर्ट मधील आरसे महाल 

अंबेर फोर्ट

अंबेर फोर्ट

अंबेर फोर्ट मधील हत्तीसाठीची पाण्याची व्यवस्था 

अंबेर फोर्ट

अंबेर फोर्ट

अंबेर फोर्ट

अंबेर फोर्ट

कळसुत्री बाहुल्यांचा खेळ

जल महाल

राजस्थानचं वाहन 

हलवाई  

चौकी धानी
चौकी धानी

चौकी धानी

चौकी धानी मधलं सुग्रास राजस्थानी जेवण 
चौकी धानी - राम राम सा 





LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates