पोर्ट्रेट आर्टीस्ट
ग्रुपचा दुसरा वार्षिक सोहळा ‘पोर्ट्रेट पेंटींग इन आउटडोअर लाईट’ हा विषय घेऊन
बोरिवली यथील वनविहार गार्डन, देविदास मार्ग, ओम शांती चौक, बोरिवली (प.) येथे
दिनांक ५ आणि ६ मार्च २०१६ रोजी संपन्न
होणार आहे. दिनांक ५ मार्च २०१६ रोजी सकाळी १० वाजता चार प्रस्थापित कलाकारांची पोर्ट्रेट
पेंटींगची प्रात्यक्षिकं एकाच वेळी चालू होतील. यात चित्रकार वासुदेव कामत
जलरंगात, प्रा. प्रणाम सिंग (बनारस) हे स्वॉप्ट पेस्टलस, शिलाकार चंद्रजीत यादवे
हे शिला घडवतील आणि गतवर्षीच्या पोर्ट्रेट आर्टीस्ट ग्रुपच्या स्पर्धेतील अंतीम
विजेत मनोज साकले हे तैलरंगात पोर्ट्रेट साकार करतील. दुपारनंतर चित्रकार वासुदेव
कामत, प्रा. प्रणाम सिंग, शिलाकार चंद्रजीत यादवे यांचं पोर्ट्रेट या विषयावर
मार्गदर्शनपर व्याख्यान होईल. दिनांक ६ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी ३
वाजेपर्यंत २०१५-२०१६ वर्षभरातील व्दिमासिक व्यक्ति चित्रण स्पर्धेचे सहा विजेते
राजेश सावंत, अमीत धाने, अजय देशपांडे, स्नेहल पागे, नानासाहेब येवले आणि अक्षय पै
यांची प्रत्यक्ष अंतीम स्पर्धा ‘पोर्ट्रेट पेंटींग इन आउटडोअर लाईट’ घेतली जाईल. या
स्पर्धीतील सर्वोत्तम चित्रास ‘चित्रकार वासुदेव कामत ग्रॅण्ड प्राईझ ट्रॉफी आणि
रुपये ७५,००० प्रथम विजेत्यास रुपये ५०,००० व्दितीय विजेत्यास रुपये २५,००० आणि
उर्वरीत तिघांना प्रत्येकी रुपये १५,००० ची पारितोषिकं देऊन सन्मानीत करण्यात
येईल.
सुप्रसिद्ध चित्रकार
वासुदेव कामत आणि कलामित्र यांच्या पुढाकाराने २०१३ साली पोर्ट्रेट आर्टीस्ट
ग्रुपची थापना करण्यात आली. व्यक्ति चित्रण आणि यथार्थवादी शैलीत कलानिर्मिती
करणार्या कलाकारांना ‘विचार आणि अभिव्यक्ति मंच’ उपलब्ध करून देण्याच्या
उद्देशाने पोर्ट्रेट आर्टीस्ट ग्रुपचा ही चळवळ सुरू करण्यात आली. क्यक्ति चित्रण,
निसर्ग चित्रण आणि सजिवाकृतींच्या चित्रनिर्मितींची कमी होत जाणारी संख्या लक्षात
घेऊन त्याला पुन्हा संजिवनी देण्याचा पोर्ट्रेट आर्टीस्ट ग्रुपचा निर्धार
आहे.
या दोन्ही दिवसातील
सर्व कार्यक्रम कलाजगतातील विद्यार्थी तसेच सर्व कलारसिकांना पर्वणीच ठरणार आहेत.
या कार्यकरमाला सर्वांना विनामुल्य प्रवेश दिला जाईल. अधिक माहितीसाठी सौ. भारती
वासुदेव कामत 022-28456613, 9820797956 या क्रमांकावर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment