अकबर बादशहाने राणा सांगाला सीकरी येथे हरवल्यानंतर इथे राजधानी स्थापन केली. १५७१ ते १५८५ एवध्या अल्प काळासाठीच ही राजधानी म्हणून होती. राजधानीला पाणी कमी पडू लागल्याने पुन्हा एकदा आग्र्याच्या लाल किल्ल्यात राजधानी हालवली गेली. फतेहपुर सीकरी हिंदू आणि मुस्लिम वास्तुशिल्पकलेच्या मिश्रणाचा सर्वात उत्कृष्ट नमुना आहे. फतेहपुर सीकरी मशीद ही मक्काच्या मशीदीची प्रतिकृती आहे. हिंदू आणि पारसी वास्तुशिल्पाच्या डिझाइन वरून ही साकारण्यात आली आहे. ५४ मीटर ऊंच असलेला बुलंद दरवाजा हे मशीदीचं प्रवेश व्दार आहे. मशीदीच्या उत्तरेला शेख सलीम चिश्तीचा दरगा आहे जिथे नि:संतान महिला आशिर्वादासाठी येतात.
वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना पहाण्यासाठी तिथे गेलं पाहिजे.
No comments:
Post a Comment