हिमालय... एकदा
तिकडे गेलात की मग तो बोलावतच रहातो. मग ते धरमशाला, मनाली, गंगोत्री, नैनीताल असो की कॉर्बेट सारखं नॅशनल पार्क.
प्रत्येकाची खासियत वेगळी, रुप वेगळं. पण लडाखचं म्हणाल तर मनावर
गारूड होतं. मी आजपर्यंत १८ वेळा गेलोय लडाखला आणि आता पुन्हा जातोय. पुन्हा पुन्हा
लडाखला जायला मिळतय त्याला कारण मात्र माझा लडाखी मित्र आत्माराम परब. हो तो लडाखीच
आहे. परदेशात किंवा गावी नसला तर तो लडाखलाच असतो. तशी त्याची आणि माझी पहिली खरी भेट
लडाखलाच झाली. त्या पहिल्या भेटी नंतर तो लडाखला बोलावत राहिला आणि मी जात राहिलो.
आता पुन्हा जातोय लडाख फेस्टीव्हलला. नुकत्याचा संपलेल्या गणेशोत्सवासाठी आत्मा सोबत
गावी गेलो होतो. आता लडाखोत्सवसाठी लेहला जाणार.
लडाखचे सोन्याचा
वर्ख चढवलेले डोंगर थोड्याच दिवसात बर्फाचा सफेद मुकुट धारण करतील आणि तिथे शिशीराला
सुरवात होईल, त्या आधी तिकडे लडाख फेस्टीव्हल साजरा होईल. त्याला गेलं पाहिजे, अर्थात सोबत ईशा टुर्सचे उत्साही पर्यटक ही आहेत.
या वेळची लडाख
सफर आणखी एका कारणामुळे खास असणार आहे. रद्द झालेलं कारण आर्टिकल ३७०... आता लडाख खर्या
अर्थाने मोकळा श्वास घेतय. श्रीनगराच्या जोखडातून लडाख मुक्त झालाय. स्वतंत्र झालाय.
या मुक्त लडाखमध्ये मी प्रथमच जाणार आहे. म्हणून जरा जास्तच जोश आहे. लडाख बोलावत आहे.
Ladakh is calling…!
No comments:
Post a Comment