16 December, 2011

लडाखचे अंतरंग पुण्यात




लडाखचे अंतरंग जाणून घेणं ही पर्वणी असते. एखाद दूसर्‍या लडाख भेटीत लडाखच्या सौदर्याची तशी कल्पना येत नाही. गेली पंधरा वर्ष सातत्याने लडाखच्या वाटा धुंडाळणारे आत्माराम परब यांनी छायाचित्रणाच्या माध्यमातून लडाखचे हजारो मुडस्  टिपले आहेत. अनेक अनवट वाटा पादाक्रांत करत असताना लडाख प्रांत त्याना अधिकाधिक भावत गेला. शुन्यच्या खाली तीस पस्तीस तपमान गेलं असतानाही तीथे जावून गोठलेलं लडाख त्यांनी अनुभवलं आहे. असं करता करता लडाख हा त्यांचा ध्यास झाला. भरवश्याची सरकारी नोकरी सोडून इशा टुर्स ही स्वत:ची टुर कंपनी स्थापन केली आणि पर्यटन व्यवसायाला वाहून घेतलं. आपण पाहिलेले असे अनेक नजारे इतरांना पाहाता यावेत, हौशी छायाचित्रकारांना उत्तमोत्तम फोटो काढता यावेत असा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन वॉन्डरर्स हा फोटोग्राफी क्लब स्थापन केला, त्यालाही आता दहा वर्ष होवून गेली. आजवर १४० हून जास्त छायाचित्रकारांनी वॉन्डरर्सच्या माध्यमातून आपली कला लोकांसमोर मांडली आहे.  

लडाखचे अंतरंग दाखवणारं एक प्रदर्शन काल पासून पुण्यात सुरू झालं आहे. कोथरूड, पुणे येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सदर प्रदर्शन १५ ते १८ डिसेंबर २०११ सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू आहे. या प्रदर्शनात रेखा भिवंडीकर, स्मिता रेगे, गीतांजली माने, नरेंद्र प्रभू, गिरीश गाडे आणि स्वत: आत्माराम परब यांनी भाग घेतला आहे.

सदर प्रदर्शनात सर्वांना विनामुल्य प्रवेश दिला जाईल. रसिकांनी लडाखच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यावा ही विनंती.                   
















 


08 December, 2011

'ब्लॉगविश्वातील हिंदी' कल्याणमध्ये राष्ट्रीय चर्चासत्र






ठाणे/खास प्रतिनिधी
(लोकसत्ता मधून साभार)
कल्याण येथील अग्रवाल कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि विश्वविद्यालय अनुदान आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने  ९ आणि १० डिसेंबर रोजी ब्लॉगविश्वातील हिंदीया विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. 

हिंदी ब्लॉगिंग : स्वरूप, व्याप्ति और संभावनायेंअसे या चर्चासत्राचे स्वरूप आहे. शुक्रवारी सकाळी उद्घाटनानंतर दुपारी १२ वाजता हिंदी ब्लॉगिंगची ओळख या चर्चासत्रात बिर्ला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. आर. पी. त्रिवेदी, अविनाश वाचस्पती, रवींद्र प्रभात, आलोक भट्टाचार्य, डॉ. डी. के. मिश्रा, डॉ. पवन अग्रवाल, डॉ. शशी मिश्रा, संगीता सहजवानी, नरेंद्र प्रभू, डॉ. आर. बी. सिंह सहभागी होणार आहेत.

त्याच दिवशी दुपारी अडीच ते साडेचार या वेळेत हिंदी ब्लॉगिंग की उपयोगिताया विषयावरील चर्चासत्रात शितलाप्रसाद दुबे, सिद्धार्थ शंकर त्रिपाठी, शैलेश भारतवासी, सुरेशचंद्र शुक्ला, अशोककुमार, डॉ. विभा, डॉ. ईश्वर पवार, डॉ. चंद्रप्रकाश मिश्रा, आशीष मोहता, मानव मिश्रा, डॉ. विनीता आणि रत्ना निंबाळकर भाग घेणार आहेत.

शनिवारी सकाळी साडेदहा वाजता हिंदी ब्लॉगिंग के विविध आयामया विषयावरील चर्चासत्रात डॉ. सतीश पांडे, हरीश अरोरा, अनुप सेठी, गिरीश बिल्लोरे, डॉ. अनिल सिंह, संतोष मोटवानी, डॉ. संज्योती सानप, डॉ. रुपेश श्रीवास्तव, डॉ. श्यामसुंदर पांडे, डॉ. कामयानी भाग घेणार आहेत. दुपारी १२ वाजता हिंदी के प्रचार-प्रसार में ब्लॉगिंग का योगदानया विषयावरील चर्चासत्रात डॉ. अशोक कुमार, युसूस खान, नीरज गोस्वामी, डॉ. के. पी. सिंह, अनिता कुमार, केवलराम, संजीव दुबे, डॉ. भारती सानप, डॉ. विजय गाडे आणि डॉ. शमा खान विचार मांडणार आहेत. 

दोन दिवसांच्या या चर्चासत्राचे वेबकास्टिंगद्वारे इंटरनेटवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.  



07 December, 2011

ज्याचा त्याचा सूर्य







नासाच्या दुर्बिणीला गवसली दुसरी वसुंधरा! ही बातमी आज लोकसत्ता मध्ये वाचली. केप्लर अंतराळ दुर्बिणीला आपल्या पृथ्वी सारखाच एक ग्रह अंतराळात दिसला आहे. प्रथम दर्शनी पृथ्वीचे गुणधर्म असलेला हा ग्रह आहे. तो ग्रह एका वेगळ्याच सूर्या भोवती फिरत आहे. त्या सूर्या पासून उर्जा घेत आहे. त्या सूर्याचं आणि त्या पृथ्वीच एक नातं आहे. ती पृथ्वी  २९० दिवसांत त्या सूर्या भोवतालची एक प्रदक्षणा पूर्ण करते. त्या ग्रहावर पाणी, वातावरण आणि जीव सृष्टी असण्याची शक्यता आहे. थोडक्यात ती पृथ्वी त्या सूर्यावर अवलंबून आहे.

आपण ज्या पृथ्वीवर राहातो ती पृथ्वी आपल्या सूर्यावर अवलंबून आहे. त्या सूर्यापासून ती उर्जा घेत आहे. आपणही त्याच उर्जेचा वापर करत आसतो. तसे आपण असेच एखाद्या उर्जा क्षेत्रा भेवती फिरत असेतो. त्या पासून उर्जा घेत असतो. जगत असतो. पण हे करताना आपण काही वेळा, नव्हे बर्‍याच वेळा त्या उर्जा क्षेत्राला पर्यायाने आपल्या सूर्याला विसरून गेलेले असतो किंवा त्या सूर्याची दखल घेत नसतो. हे असं असलं तरी कुठली तरी अज्ञान दुर्बिण आपल्याला पाहात असेलच नाहीका? आपण त्यालाच देव पाहात असतो असं म्हणत असतो.

चाराचर सृष्टी, आपली पृथ्वी, ग्रह मंडळ, आपली आकाशगंगा, लांबवर दिसणारी आपल्या आकाशगंगे बाहेरील अँड्रोमीडा ही आणखी एक आकाशगंगा, अशा अनेक आकाश गंगा, अब्जावधी प्रकाशवर्षं दूर आसणार्‍या आणखी काही, अनेक कृष्ण विवरं आणि अजून अज्ञात असलेलं बरच काही.  या सगळ्या प्रचंड व्यापात आपण कशा भोवती तरी रोज फिरत असतो, त्याच वर्तूळात गोल गोल फिरत राहातो, असूदे फिरूया पण त्याच वेळी ज्या सूर्या पासून आपण उर्जा घेतो त्याचीही आठवण ठेऊया!    

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates