‘नासा’च्या दुर्बिणीला गवसली दुसरी वसुंधरा! ही बातमी आज लोकसत्ता मध्ये वाचली. केप्लर अंतराळ दुर्बिणीला आपल्या पृथ्वी सारखाच एक ग्रह अंतराळात दिसला आहे. प्रथम दर्शनी पृथ्वीचे गुणधर्म असलेला हा ग्रह आहे. तो ग्रह एका वेगळ्याच सूर्या भोवती फिरत आहे. त्या सूर्या पासून उर्जा घेत आहे. त्या सूर्याचं आणि त्या पृथ्वीच एक नातं आहे. ती पृथ्वी २९० दिवसांत त्या सूर्या भोवतालची एक प्रदक्षणा पूर्ण करते. त्या ग्रहावर पाणी, वातावरण आणि जीव सृष्टी असण्याची शक्यता आहे. थोडक्यात ती पृथ्वी त्या सूर्यावर अवलंबून आहे.
आपण ज्या पृथ्वीवर राहातो ती पृथ्वी आपल्या सूर्यावर अवलंबून आहे. त्या सूर्यापासून ती उर्जा घेत आहे. आपणही त्याच उर्जेचा वापर करत आसतो. तसे आपण असेच एखाद्या उर्जा क्षेत्रा भेवती फिरत असेतो. त्या पासून उर्जा घेत असतो. जगत असतो. पण हे करताना आपण काही वेळा, नव्हे बर्याच वेळा त्या उर्जा क्षेत्राला पर्यायाने आपल्या सूर्याला विसरून गेलेले असतो किंवा त्या सूर्याची दखल घेत नसतो. हे असं असलं तरी कुठली तरी अज्ञान दुर्बिण आपल्याला पाहात असेलच नाहीका? आपण त्यालाच देव पाहात असतो असं म्हणत असतो.
चाराचर सृष्टी, आपली पृथ्वी, ग्रह मंडळ, आपली आकाशगंगा, लांबवर दिसणारी आपल्या आकाशगंगे बाहेरील अँड्रोमीडा ही आणखी एक आकाशगंगा, अशा अनेक आकाश गंगा, अब्जावधी प्रकाशवर्षं दूर आसणार्या आणखी काही, अनेक कृष्ण विवरं आणि अजून अज्ञात असलेलं बरच काही. या सगळ्या प्रचंड व्यापात आपण कशा भोवती तरी रोज फिरत असतो, त्याच वर्तूळात गोल गोल फिरत राहातो, असूदे फिरूया पण त्याच वेळी ज्या सूर्या पासून आपण उर्जा घेतो त्याचीही आठवण ठेऊया!
No comments:
Post a Comment