मुंबई जवळ असलेलं एक शांत, सुंदर गाव अनुभवायचं असेल तर नेरळच्या सगुणा बागेत गेलं पाहिजे. नुकताच मी सगुणा बागेत जाऊन आलो. पाच वर्षांपुर्वीही गेलो होतो. त्या पेक्षा आता जास्त सोयी तिकडे दिसून आल्या. शहरा जवळच्या या शांत गावात पंचावन्न एकर जागेवर पसरलेलं हे कृषी पर्यटन आणि संशोधन केंद्र आहे. समोरच माथेरानच्या डोंगर रांगा, सगुणा बागेला खेटून जाणारी स्वच्छ निर्मळ उल्हास नदी, मन प्रफुल्लीत करणारी शेती-बागायती आणि हसत मुख माणसं हे सगुणा बागेचं वैशिष्ठ्य आहे.
तीस पस्तीस वर्षांपुर्वी शेखर भडसावळे यांनी अमेरीकेतली मोठ्या पगाराची नोकरी सोडून गावचा रस्ता धरला आणि वडिलोपार्जीत शेती करायचा निर्णय घेतला. आज तागायत शेतीत निरनिराळे प्रयोग करून त्यांनी उत्तम शेती तर केलीच पण ती किफायतशीर व्हावी म्हणून अनेक उपक्रम राबवले. नेरळचं सगुणा बाग कृषी संशोधन आणि पर्यटन केंद्र हे त्यांच्या या प्रयत्नांचंच फलीत आहे.
सगुणा बागेतल्या कॉटेज मध्ये प्रवेश करताच गावच्या घराचा भास होतो, असं असलं तरी त्या कुटीत आवश्यक सोयीही आहेत. सगुणा बागेच्या विस्तीर्ण परिसरात सात ते आठ तळी असून त्या मध्ये आधूनीक पद्धतीने मस्यपालन केलं जातं आणि आलेल्या पाहुण्यांना त्या लज्जतदार माश्यांची चवही चाखता येते. सगुणा बागेत आलेल्या पाहुण्यांना तिथल्याच शेतात तयार होणार्या भाज्या, तादूळ, कडधान्य यांचा अंतर्भाव असलेलं सकस भोजन असा पाहुणचार मिळतो. एकाच वेळी पन्नास पाहुण्यांची सोय होईल एवढ्या कॉटेजीस तिथे आहेत, पण दिवसाच्या सहलीसाठी एका वेळी सातशे माणसांची सोयही तिथे होवू शकते.
तळ्यातलं घर |
शेखर भडसावळे |
No comments:
Post a Comment