लडाखचे अंतरंग जाणून घेणं ही पर्वणी असते. एखाद दूसर्या लडाख भेटीत लडाखच्या सौदर्याची तशी कल्पना येत नाही. गेली पंधरा वर्ष सातत्याने लडाखच्या वाटा धुंडाळणारे आत्माराम परब यांनी छायाचित्रणाच्या माध्यमातून लडाखचे हजारो मुडस् टिपले आहेत. अनेक अनवट वाटा पादाक्रांत करत असताना लडाख प्रांत त्याना अधिकाधिक भावत गेला. शुन्यच्या खाली तीस पस्तीस तपमान गेलं असतानाही तीथे जावून गोठलेलं लडाख त्यांनी अनुभवलं आहे. असं करता करता लडाख हा त्यांचा ध्यास झाला. ‘भरवश्याची’ सरकारी नोकरी सोडून ‘इशा टुर्स’ ही स्वत:ची टुर कंपनी स्थापन केली आणि पर्यटन व्यवसायाला वाहून घेतलं. आपण पाहिलेले असे अनेक नजारे इतरांना पाहाता यावेत, हौशी छायाचित्रकारांना उत्तमोत्तम फोटो काढता यावेत असा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ‘वॉन्डरर्स’ हा फोटोग्राफी क्लब स्थापन केला, त्यालाही आता दहा वर्ष होवून गेली. आजवर १४० हून जास्त छायाचित्रकारांनी ‘वॉन्डरर्स’च्या माध्यमातून आपली कला लोकांसमोर मांडली आहे.
लडाखचे अंतरंग दाखवणारं एक प्रदर्शन काल पासून पुण्यात सुरू झालं आहे. कोथरूड, पुणे येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सदर प्रदर्शन १५ ते १८ डिसेंबर २०११ सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू आहे. या प्रदर्शनात रेखा भिवंडीकर, स्मिता रेगे, गीतांजली माने, नरेंद्र प्रभू, गिरीश गाडे आणि स्वत: आत्माराम परब यांनी भाग घेतला आहे.
No comments:
Post a Comment