ठाणे/खास प्रतिनिधी
(लोकसत्ता मधून साभार)
कल्याण येथील अग्रवाल कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि विश्वविद्यालय अनुदान आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने ९ आणि १० डिसेंबर रोजी ‘ब्लॉगविश्वातील हिंदी’ या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
‘हिंदी ब्लॉगिंग : स्वरूप, व्याप्ति और संभावनायें’ असे या चर्चासत्राचे स्वरूप आहे. शुक्रवारी सकाळी उद्घाटनानंतर दुपारी १२ वाजता हिंदी ब्लॉगिंगची ओळख या चर्चासत्रात बिर्ला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. आर. पी. त्रिवेदी, अविनाश वाचस्पती, रवींद्र प्रभात, आलोक भट्टाचार्य, डॉ. डी. के. मिश्रा, डॉ. पवन अग्रवाल, डॉ. शशी मिश्रा, संगीता सहजवानी, नरेंद्र प्रभू, डॉ. आर. बी. सिंह सहभागी होणार आहेत.
त्याच दिवशी दुपारी अडीच ते साडेचार या वेळेत ‘हिंदी ब्लॉगिंग की उपयोगिता’ या विषयावरील चर्चासत्रात शितलाप्रसाद दुबे, सिद्धार्थ शंकर त्रिपाठी, शैलेश भारतवासी, सुरेशचंद्र शुक्ला, अशोककुमार, डॉ. विभा, डॉ. ईश्वर पवार, डॉ. चंद्रप्रकाश मिश्रा, आशीष मोहता, मानव मिश्रा, डॉ. विनीता आणि रत्ना निंबाळकर भाग घेणार आहेत.
शनिवारी सकाळी साडेदहा वाजता ‘हिंदी ब्लॉगिंग के विविध आयाम’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. सतीश पांडे, हरीश अरोरा, अनुप सेठी, गिरीश बिल्लोरे, डॉ. अनिल सिंह, संतोष मोटवानी, डॉ. संज्योती सानप, डॉ. रुपेश श्रीवास्तव, डॉ. श्यामसुंदर पांडे, डॉ. कामयानी भाग घेणार आहेत. दुपारी १२ वाजता ‘हिंदी के प्रचार-प्रसार में ब्लॉगिंग का योगदान’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. अशोक कुमार, युसूस खान, नीरज गोस्वामी, डॉ. के. पी. सिंह, अनिता कुमार, केवलराम, संजीव दुबे, डॉ. भारती सानप, डॉ. विजय गाडे आणि डॉ. शमा खान विचार मांडणार आहेत.
दोन दिवसांच्या या चर्चासत्राचे वेबकास्टिंगद्वारे इंटरनेटवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
No comments:
Post a Comment