11 April, 2019

९०० पेक्षा जास्त कलाकारांचा भाजपला पाठिंबा९०० पेक्षा जास्त कलाकार आणि लेखकांनी एकत्र येऊन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला आहे. नेशन फर्स्टया मंचाखाली एकत्र येऊन या कलाकार व लेखकांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. देशाच्या प्रगतीसाठी मजबूर नाही तर मजबूत सरकार पाहिजे असे या पत्रकात म्हटले आहे. यात पंडित जसराज, उस्ताद गुलाम मुस्तफा खान, मालिनी अवस्थी, विवेक ओबेरॉय, कोयना मित्रा, गायिका अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन, रिता गांगुली यांच्यासह ९०७ कलाकारांचा समावेश आहे.

या कलाकारांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांचेही कौतूक केले आहे. काही दिवसांपूर्वी सहाशेहून अधिक कलाकारांनी भाजप आणि मित्रपक्षांविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. यात अमोल पालेकर, नसिरहुद्दीन शाह, गिरीश कर्नाड आदी कलाकारांचा सामावेश होता. भाजपला सत्तेतून खाली खेचा, असे सांगत व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचे त्यांनी म्हटले होते. यानंतर अनेक दिग्गज कलाकार भाजप व पंतप्रधान मोदींच्या समर्थानात उतरले होते. याच धर्तीवर ९०७ कलाकार नेशन फर्स्टया मंचाखाली एकत्र येऊन भाजप आणि मोदींची देशाला आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

मोदी सरकार चांगले काम करत असून मागील पाच वर्षात देशाची प्रतिष्ठा वाढली आहे. दहशतवाद या समस्येविरोधात उभे राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव व्यक्ती आहेत. त्यामुळे देशाला एका मजबूत सरकारची गरज आहे. गेल्या पाच वर्षात देशाने भ्रष्टाचारमुक्त, सुशासन, देशाला विकासाच्या मार्गावर नेणारे सरकार पाहीले आहे, त्यामुळे देशाचा विकास करायचा असेल आणि दहशतवादाला हद्दपार करायचं असेल तर सध्याच्या घडीला कमकुवत नाही तर मजबूत सरकारची आवश्यकता आहे. याचमुळे जनतेने कोणत्याही दबावात न येता मतदान करण्याचे आवाहन या कलाकारांनी केले आहे.

07 April, 2019

‘शत्रू मालमत्तां’ची विक्रीमाहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी विप्रो लिमिटेडमधील शत्रू पक्षाच्या ताब्यात असलेल्या समभागांची एलआयसी आणि अन्य दोन सरकारी विमा कंपन्यांना विक्री करून केंद्र सरकारने सुमारे १,१५० कोटी रुपयांचा महसूल कमावल्याचे जाहीर केले.

भारतातून पाकिस्तान अथवा चीनमध्ये स्थलांतरित झालेल्या आणि भारताचे नागरिकत्व संपुष्टात आलेल्या लोकांच्या मालकीच्या संपत्तीचे केंद्र सरकारने भारतातील शत्रू मालमत्तेचे पालकअशा विशेष कंपनीखाली एकत्रीकरण केले असून, तिच्याकडून दुश्मन मालमत्ता आणि भांडवली समभागांची काळजी वाहिली जाते. विप्रोतील शत्रू पक्षाच्या एकूण ४.४३ कोटी समभाग प्रत्येकी २५८.९० रुपये किमतीला विकून १,१५० कोटी रुपये सरकारने मिळविले असून, ते केंद्राच्या निर्गुतवणूक महसुलात जमा झाले आहेत.

एलआयसीने यापैकी सर्वाधिक ३.८६ कोटी समभाग खरेदी केले आहेत. बरोबरीने जीआयसी आणि न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स या सामान्य विमा कंपन्यांनी खरेदीत सहभाग घेतला.

शत्रू मालमत्ता कायदा, १९६८ नुसार, ‘शत्रू मालमत्ताम्हणजे शत्रू राष्ट्रातील लोकांच्या, मालकीच्या अथवा शत्रूच्या वतीने व्यवस्थापित मालमत्ता असा संदर्भ आला आहे. या मालमत्ता, विशेषत: स्थावर जंगम मालमत्ता गेले काही दशके हे विनावापर पडून होत्या. नोव्हेंबर २०१८ मध्ये सरकारने या मालमत्तांच्या विल्हेवाटीची पद्धत निश्चित करून, त्यानुसार विप्रोतील समभागांची झालेली ही पहिली विक्री आहे.

30 March, 2019

टेरर फंडीगला मोदी सरकारचा दणका


टेरर फंडीगला मोदी सरकारने जोरदार दणका दिला आहे. श्रीनगर मध्ये वर्षानुवर्षं ठाण मांडून बसलेल्या आणि पाकिस्तानच्या पैशावर पोसल्या गेलेल्या दहशतवादाला नेस्तनाबूत करण्यासाठी टेरर फंडीगचा माग घेण्यासाठी सरकारने कृती गट स्थापन केला आहे.

मोदी सरकारच्या याच धोरणाला आता यश येत असून सक्त वसूली संचालयाने (ED) काल फुटीरतावादी नेता शाबीर शाह याची श्रीनगरमधील संपत्ती जप्त केली आहे. त्याला हाफिज सईदकडून पैशांचा पुरवठा होता होता. चौदा वर्षे जुन्या दहशतवाद अर्थपुरवठा  व काळ्या पैशाच्या प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले.

जम्मू काश्मीरची उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगर येथील रावळ पोरा भागात एफंडी बाग येथे शहा यांची मालमत्ता असून ती जप्त करण्याचे आदेश सक्तवसुली संचालनालयाने काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दिले होते. सरकारने सध्या काश्मीरमधील फुटीरतावाद्यांवर कारवाईचा वरवंटा फिरवण्यास सुरूवात केली असून त्यात दहशतवादाच्या आर्थिक नाडय़ा तोडण्याचा हेतू आहे. शाबीर शाह व त्याची पत्नी यांच्या नावे २५.८ लाख रूपये किमतीचे हे घर असून ते जप्त करण्यात आले आहे. शाह हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याचा अनेक बेकायदेशीर कारवायांत हात आहे. त्याचा साथीदार महंमद अस्लम वाणी हा जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. शाह हा वाणी याच्या माध्यमातून हवालाचा पैसा गोळा करीत होता. हा पैसा  पाकिस्तानातून येत होता. सक्तवसुली संचालनालयाने म्हटले आहे, की १९९९ मध्ये  त्याच्या सासऱ्यांनी हे घर त्याच्या नावाने खरेदी केले होते. नंतर ते शाह याची पत्नी व मुलींना त्याच्या मेहुणीने भेट म्हणून दिले. शाह याचे सासरे व मेहुणी याना या घरासाठीचे पैसे कुठून आणले याचे स्पष्टीकरण करण्यासाठी बराच अवधी देण्यात आला होता. चौकशीत असे निष्पन्न झाले, की शाह हा या मालमत्तेचे खरा मालक असून त्यालाही सासऱ्याने हे घर कुठल्या पैशातून घेतले हे सांगता आले नाही.

हाफिज सईदकडून पैशांचा पुरवठा
शाबीर शाह हा जागतिक दहशतवादी हाफिज सईद याच्या संपर्कात होता व त्याच्याकडून दहशतवादी कारवायांसाठी पैसे स्वीकारत होता. अनेक संशयास्पद व्यवहार करून त्याने मालमत्ता जमवल्या असून शाह व वाणी यांना २०१७ मध्ये सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती. वाणी याला जानेवारी २०१९ मध्ये जामीन मिळाला आहे. ऑगस्ट २००५ मध्ये दिल्ली पोलिसांनी वाणी याला शाबीर शाह यांना २.२५ कोटी रूपये हवालामार्गे दिल्याच्या आरोपावरून अटक केली होती.    

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates