09 January, 2011

पुर्वांचलाची चित्र सफर भाग ९

अरुणाचल प्रदेश मधल्या तवांगची मनसोक्त भ्रमंती करायचं माझं स्वप्न पुर्ण करून आम्ही तवांग सोडलं तरी त्या प्रदेशाने केलेलं गारूड अद्याप कमी झालेलं नाही. तळ्यांचं तवांग मागे पडलं तरी निसर्गाचे अनंत विभ्रम पाहातच से-ला-पासच्या दिशेने आमची गाडी मार्गक्रमण करत होती. नितांत सुंदर वाटा, कडे-कपार्‍या आणि धबधबे, काही प्रवाही काही गोठलेले. जीवनच जणू संथगतीने वहातय कसली घाई नाही की कसली गडबड. भारत-चीन युद्धात पराक्रम गाजवलेल्या जसवंत सिंह यांच्या स्मारकाला भेट दिली. तिथल्या सैनिकांनी आग्रहपुर्वक दिलेला अमृततुल्य चहा पिऊन पुढे निघालो आणि सारा आसमंत धुक्यात विरून गेला. याच प्रवासातली हि काही छायाचित्रं. 


 

  1. पूर्वांचलाची चित्र सफर भाग १
  2. पूर्वांचलाची चित्र सफर भाग २
  3. पूर्वांचलाची चित्र सफर भाग
  4. पुर्वांचलाची चित्र सफर भाग ४
  5. पुर्वांचलाची चित्र सफर भाग ५
  6. पुर्वांचलाची चित्र सफर भाग ६
  7. पुर्वांचलाची चित्र सफर भाग ७
  8. पुर्वांचलाची चित्र सफर भाग ८
  9. पुर्वांचलाची चित्र सफर भाग ९ 

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates