भल्या पहाटे हत्तीवरून काझीरंगा फिरण्यासारखी दुसरी मौज नाही. आम्ही जीप मधून हत्तींच्या तळा पर्यंत पोहोचलो, तेव्हा अजून सारखं दिसतही नव्हतं. आदल्या दिवशीच तिकीटाची व्यवस्था केल्याने आता हत्तीवर आरूढ होवून निघायच तेवढं बाकी होतं. एका रांगेत उभे राहून मग आम्ही मचाणावर चढलो, एक हत्ती घेवून माहूत आला. आम्ही तीघं त्याच्यावर बसलो. दाट धुक्यातून वाट काढत हत्ती चालायला लागला. अरे हो ती हत्तीण होती. हत्ती एवढ्याच वाढलेल्या एलीफंटाग्रास मधून आम्ही जात होतो. हळूहळू सुर्य वर आला आणि बघा काझीरंगाचा राजा आम्हाला कसा सामोरा आला तो......!
वाह.. खुपच सुंदर आहेत फोटॊ. मी जेंव्हा आसाम मधे होतो तेंव्हा मेघालय ला गेलो असतांना काझीरंगा पण पाहिलं होतं. पण ती गोष्ट आहे बरीच जुनी. तेंव्हा अजिबात सोय नव्हती रहाण्याची वगैरे..
ReplyDeleteफोटो आवडले.
purvaanchal - poorvaanchal,
ReplyDeletenarakaasoor - should be - narakaasur , (soor refers to sa-re-ga-ma)
somehow i am unable to type in devnagari while commenting .
महेंद्र, सध्या माझा मित्र पूर्वांचलाच्या सफरीवर आहे. त्याचा फोन आला की आठवणी ताज्या होतात. आपली प्रतिक्रीया वाव्हून आणखी फोटो टाकायला हुरूप येतो.
ReplyDelete