काही माणासांना काम करण्या पेक्षा ते न करण्यातच पुरूषार्थ का वाटतो असा खरच प्रश्न पडतो. आपल्या हातून काही चांगलं घडत नसेल तर निदान वाईट तरी करू नका. एखाद्याचं काम अडवणं, दुसर्याला मोठेपणा मिळेल म्हणून गैरमार्गाने अडथळा आणणं, अधिकाराचा गैरवापर करणं, चांगल्या बाबतीत बिब्बा घालणं, कसं होतं ते बघतो म्हणणं, हो करतो म्हणून ते कधीच न करणं, एकीकडे संतपणाचा आव आणत दुसरीकडे अपेक्षा करणं, हे सगळं केलच पाहीजे का?
तुम्ही असं किती दिवस अडवणार? तुम्ही ज्या खुर्चीवर बसला अहात ते अढळ पद नक्कीच नाही. बदल ही एकच गोष्ट सातत्याने घडत असते. Constant is a change. आज तुम्ही अहात उद्या दुसरा कुणीतरी. पण उद्या तुम्ही नसाल ना तेव्हा, तेव्हा सुद्धा जर लोकांनी तुम्हाला लक्षात ठेवावं असं वाटत असेल तर आज आपल्या हातात आहेत ती लोकांची कामं करा. जर तुम्हाला काही करता येत नसेल किंवा करायची इछा नसेल तर निदान ते काम होत असताना त्या मधला अडथळा तरी बनू नका. ते काम वैयक्तीक असलं तरी आणि सार्वजनिक असलं तरी. सार्वजनिक हिताचं काम तर प्राधान्याने केलं पाहीजे. त्यात कोणत्याच प्रकारचा अडथळा नको. निरपेक्ष पणे समाजाचं काम करणारी मंडळी ते करतात तेव्हा त्या कामात सगळ्यांच्या सहकार्याचीच अपेक्षा असते. अडथळ्यांची नव्हे. तेव्हा शुक्राचार्य बनू नका. बघा हजारो वर्ष झाली पण शुक्राचार्य लक्षात राहीले ते त्यांच्या वाईट गुणांसाठी. निगेटीव्ह प्रसिध्दी कुणाला हवी हवीशी वाटेल? कोण पसंत करेल?
पैसा हाच परमेस्श्वर असणाऱ्यांसाठी कोण हा शुक्राचार्य ?
ReplyDeleteहरेक्रिष्णजी, पैसा आहेच, पण इगो सुद्धा आडवा येतो. माणसं वाढता वाढता छोटी होतात, त्याला काय करायचं?
ReplyDeleteप्रत्येक मनुष्याला आपला अहंकार सिद्ध करण्याची गरज असते. याला तुम्ही किवा मीदेखील अपवाद नाही. यासाठी वापरले जाणारे मार्ग त्या त्या व्यक्तीच्या अहंकाराच्या पातळीवर अवलंबून असतात. बहुतेकांच्या अहंकाराची कुवत दुसय्राला अपशकून करून स्वतःचे श्रेष्ठत्व मिरवण्याइतकीच असते. असे करताना आपली किंमत कमी होते याचा विचार करणे त्यांच्या कुवतीबाहेर असल्याने समजावण्याचा प्रश्र्नच येत नाही.
ReplyDelete