सरकार बनवण्याच्या ओढाताणीत पंधरा दिवस गेले. मालदार, मलईदार वगैरे ‘खा’ती वाटली गेली. कुणाच्या मुखी लोणी तर कुणाच्या तोंडी अंधार आला. पण मंत्री कल्पक असेल तर कुठचही खातं कमावत होवू शकतं. पुर्वी पक्षातून निलंबीत झालेले पण नंतर गोड मानून घेतलेले ह.भ.प. मंत्री अशा पैकीच एक. मागच्या वेळी त्याना वन खातं मिळालं तेव्हा महाराष्ट्रातील एकूण वन क्षेत्र कमी झालं. बाकीच्या वन जमीनीचा त्यानी ‘विकास’ केला. आता आदिवासी विकास करण्यासाठी जाणत्या राजाने त्याना नेमलं. त्यांची नजर मोहावर आधीपासूनच होती. जंगलात गेल्यावर त्याना मोहाची फुलं दिसायची. आदिवासी त्या फुलांपासून दारू बनवतात हे त्यानी हेरलं. खात्याचा कारभार हाती आल्या आल्या त्याना त्या मोहाची ‘हर्बल लिकर’ बनवावी असा साक्षात्कार झाला. आदिवासींच तेवढच एक अन्न सरकारी कचाट्यातून सुटलेलं. तेसुद्धा आता हे ह.भ.प. हिरावून घेवू पहाताहेत.
उसाची शेती करून शेतकरी श्रीमंत झाला नाही ना कारखाना मात्र संचालक मंडळ हवेली पासून हवाला पर्यंत पोहोचलं. द्राक्ष बागायतदार उपाशी आणि वाईनरीवाले तुपाशी. आता या ‘हर्बल लिकर’मुळे काय होणार ते वेगळं सांगायला हवं का?
kuthehi gele tari hava tevhdha paisa va have te milavnari hi manse.tyasathi kuthlahi marga achranat aanayla mage pudhe pahat naaheet. tyat garib mansanche nuksan va haal hotat tyachi tyana parva naste. lekh chhan lihila aahe.
ReplyDeleteनमखार सिमा,
ReplyDeleteमरणपंथाला लागलेले आदिवासी मग नक्षलवाद्यांच्या प्रभावा खाली आले तर तो त्यांचा दोष म्हणायचा काय?