पंधरा दिवस घोळ घालून शेवटी सरकार येवू घातलय. तीच डोकी मंत्रीपदावर येतील, प्रत्येकाला आता ‘खा’तं हवं असणार. जनतेची सेवा ऎवजी खात्यातून मेवा हेच त्यांचं लक्ष आहे. शेवटी पापी पोटांचा प्रश्न आहे महाराजा...! कुणाची झाकली मुठ तर कुणाची उघडी. या आधी नालायक म्हणून काढून टाकलेल्यांना पुन्हा पावन करून घेण्याचा प्रयत्न होईल. भ्रष्टाचारी आमदारांना पुन्हा मंत्री करू नका, तसं झालं तर त्यांच्या विरोधात आंदोलन छेडलं जाईल असा इशारा जननेते अण्णा हजारे यांनी दिला आहे. या कोडग्याना आता जनाची नाही आणि मनाचीही नाही हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. ‘इतने बडे शहर’ फेम आबा २६/११ ला वर्ष व्हायच्या आधी आत घुसतील. बघू आता काय होतं ते. राजभवनात खुर्च्या तापलेल्याच आहेत.
अण्णानी भ्रष्ट आमदाराना मंत्री करण्याला विरोध करण्याऐवजी भ्रष्टाचाय्राना तिकिटे देऊ नयेत यासाठी आंग्रह धरावयास हवा होता. निवडणूक पार पडल्यावर असा विरोध करणे हा आचरटपणा आहे.
ReplyDeleteअण्णानी भ्रष्टाचाय्राना तिकिटे देऊ नयेत असा आग्रह धरला होता.
ReplyDelete