आज बालदिन, घरातलं मुल घराला घरपण देतं, ध्यानी,मनी,स्वप्नी मग ते मुलच वास करतं. माझी छकूली ऋचा त्याला अपवाद कसा असेल? आज तिच्यावर लिहीलेली हे कविता.
इवल्याच पावलांचा
मज नाद ऎकू येतो
तू उठवले मला की
स्वप्नात भास होतो?
तव पदरवात असते
लय,ताल खेळण्याची
मज वाटते असे की
आताची खेळी माझी
तू डाव मांडला हा
मी खेळलो जरासा
स्वप्नास ज्ञात सारे
जागेपणी निराशा
तू थांबली परंतू
मी खेळतोच आहे
डोळे सताड उघडे
मी, स्वप्नात राहू पाहे
येना खरीच आता
खेळावयास संगे
मी, भांडणार नाही
खेळू खरेच रंगे
सुंदर कविता...आणि फोटो पण खुप छान आलेला आहे.
ReplyDeleteबालक दिनाच्या शुभेच्छा.. तुम्हाला पण -- माझ्या ब्लॉग वरचं पोस्ट वाचा मग कळेल तुम्हाला पण का देतोय शुभेच्छा ते..
छान झालीये कविता...आणि फोटोही मस्त आहे!!!
ReplyDeleteऋचाला अनेक शुभेच्छा!!!!
आपण 'सहजच' प्रतिक्रीया दिली पण ऋचाला कित्ती बरंअ वाटलं. फोटो आवडले ना? आणखी टाकायला हुरूप आला. धन्यवाद
ReplyDelete