कान नसलेल्या भिंतीआड
पुन्हा एकदा बोलू दे
मोकळ्या मनाच्या माणसात
पुन्हा एकदा मिसळू दे
भिंतींच्या कानाआड
शब्द सारे ओठाआड
त्या शब्दांना, त्या ओठांना
पुन्हा एकदा उसळू दे
बोलके उग्र चेहरे आणि
वश झालेली कर्णपिशाच्ये
सारी त्या मसणवटीत
पुन्हा एकदा जळू दे
मोकळी हवा, मोकळे आकाश
दारातच गंगा, तिला आटवण्याचा अट्टाहास
त्या झुळूकीसह, त्या जलधारेसह
पुन्हा एकदा खेळू दे
घर-घर लागलेलं ते घर
स्मृतीआड कर लवकर
माझ्याच जुन्या घरात
मला नव्याने राहू दे
प्रचंड आशावादासह मनापासून शुभेच्छा, मोकळा श्वास आणि मोकळ आकाश मिळ्ण्यासाठी.
ReplyDeleteकविता खुप. खुप.. खुपच आवडली.
धन्यवाद.
विजयजी, धन्यवाद.
ReplyDelete