|
सूप्रसिध्द छायाचित्रकार श्री. अधिक शिरोडकर प्रदर्शनाचं उद्घाटन करताना |
‘शेडस् ऑफ लडाख’ हे छायाचित्रांचं प्रदर्शन रविंद्र नाटयमंदिर आवार, प्रभादेवी, येथे भरलं आहे. लडाख हे असं ठिकाण आहे जे आपल्याच पृथ्वी तलावरचं असूनही तिथे गेल्यावर वेगळ्या ग्रहावर आल्याचा भास होतो. बहुतांशी भाग वनस्पती विरहीत असूनही हा प्रदेश सौंदर्यात तसूभरही कमी नाही. निसर्गाच्या रंगांची अदाकारी आणि त्याच बरोबर अध्यात्माची शिखरं असलेल्या तिथल्या बौद्ध गुंफा, या सगळ्या वातावरणाशी तादात्म्य पावलेले तिथले लोक, अतिशय विषम असं हवामान, बर्फाच्छादीत पर्वत रांगा, निळं-निळं पाणी आणि निळाई ल्यालेलं आकाश, सप्तसिंधू मधली सिंधू नदी आणि तिच्या हातात हात घालून निघालेली झंस्कार नदी, अभावानेच आढळंणारं पण वैशिष्ट्यपुर्ण असं वन्यजीवन, तिथले सण, महोत्सव हे सगळच जगभरातल्या पर्यटकांचं आकर्षणाच केंद्र. आपले भारतातील चोखंदळ पर्यटकही आता लडाखकडे वळत आहेत.
‘वॉन्डररर्स’ या हौशी छायाचित्रकारांपैकी काही जण श्री. आत्माराम परब यांच्या नतृत्वाखाली याच ठिकाणी जाऊन आले. गेल्या वर्षभरात यांनी काढलेल्या चायाचित्रांचं प्रदर्शन येथे मांडण्यात आलं आहे. अशाच 'वॉन्डररर्स' पैकी मानव दवे, नरेंद्र प्रभु, गिरीश गाडे, विराज नाईक, वसूधा माधवन, गिरीश केतकर, सतिश जोशी, आणि आत्माराम परब यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पु.ल. देशपांडे कला दालन, रविंद्र नाटयमंदिर आवार, प्रभादेवी, मुंबई येथे दिनांक १६ जानेवारी ते २३ जानेवारी, २०११, सकाळी ११ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य आयोजित करण्यात आले आहे.
|
फ़ू-बाई-फू फेम अंशूमन विचारे सोबत आत्माराम परब |
या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्धाटन दिनांक १५ जानेचारी २०११ रोजी सूप्रसिध्द छायाचित्रकार श्री. अधिक शिरोडकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्यानी सर्वच छायाचित्रकारांच्या कलेचं कौतूक केलं आणि लडाखला या वयातही जावसं वाटतं असं मनोगत प्रकट केलं. या प्रदर्शनाला रसिक पर्यटन प्रेमीं बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरानी आत्तापर्यंत भेट दिली आहे आपणही या संधीचा लाभ उठवावा.
सदर प्रदर्शन 'इशा टुर्स्' ने प्रायोजित केलं असून इशा टुर्स् तर्फे या प्रदर्शनादरम्यान हिमालयातील, भ्रमंती, लडाख, स्पिती व्हॅली, भूतान, सिक्किम, असाम अरूणाचल प्रदेश, मेघालय, नागालॅन्ड, विदेशातील केनीया, दुबई तसेच अन्य ठिकाणांची महिती, स्लाईड शो चित्रफित आणि मार्गदर्शन विनामुल्य उपलब्ध करून दिले जाईल. संपर्क : 9892182655, 9320031910.
|
मा. अधिकजी आणि सहभागी छायाचित्रकार |
|
कौतूकाचे बोल |
प्रभू साहेब,
ReplyDeleteमाझ्या काही कामामुळे मला आत्माच्या प्रदर्शनाला अजूनही येता आले नाही पण मझ्या हार्दिक शुभेच्छा 'आत्मा' पर्यंत पोहचवा.
धन्यवाद.
विजयजी, आभारी
ReplyDelete