काल प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंधेला मालेगाव जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना पेट्रोल माफियांनी भर रस्त्यात जिवंत जाळले. आपलं कर्तव्य चोख बजावत असताना या प्रामाणीक अधिकार्याचा दुर्दैवी अंत झाला. ज्या नराधमाने हे कृत्य केले त्याच्या विरोधात गेली तीन-चार वर्ष तक्रारी केल्या गेल्या आहेत, खटले सूरू आहेत. असं असूनही त्या राक्षसाची ही हिम्मत होते याचा अर्थ स्थानीक पोलीस, राजकारणी आणि महसूली अधिकार्यांची या माफियांना साथ असली पाहिजे. अप्पर जिल्हाधिकारी स्थराच्या अधिकार्याला भररस्त्यात जिवंत जाळलं जात, या सारखी घटना पुरोगामी म्हटल्या जाणार्या महाराष्ट्रात होते याचा अर्थ या राज्यात, या देशात प्रजासत्ताक नसून माफीयासत्ताक आहे हे स्पष्ट आहे. सरकारने नेहमी प्रमाणे कडक कारवायीचे आदेश दिले आहेत, संबंधीताना कडक शासन केले जाईल असे आश्वासन दिले आहे. पण पडद्यामागचे खरे सुत्रधार, त्याना शासन कधी होणार? हा कळीचा मुद्दा आहे.
Masai Mara National Reserve
-
Masai Mara National Reserve is a large game reserve in Narok County, Kenya,
contiguous with the Serengeti National Park in Mara Region, Tanzania.
Ma...
5 years ago
अशा लोकांना कायद्याची जरब बसवायला हवी....
ReplyDeleteया घटनेचा जोरदार निषेध करा. महाराष्ट्राने शरमेने खाली मान घालावी, अशी ही घटना आहे
कश्या करता आपण प्रजासत्ताक दिन साजरा करायचा ????
ReplyDeleteआजच्या प्रजासत्ताक दिनाच्या बातम्यांचे हेडींग .१ काश्मीर मध्ये तिरंगा फडकवू देणार नाही केंद्र आणि ओमार काश्मिरी मुख्यमंत्री.२ काळ्या पैश्याची ची संपूर्ण माहिती देणे कायदेशीर रीत्या अशक्य भारताचे अर्थमंत्री मुखर्जी. ३ कर्तव्यदक्ष अधिकारी सोनावणे यांना महाराष्ट्रात राकेल माफियांनी जाळून ठ...ार मारल्रे सरकारचे नेहमी प्रमाणे कठोर कार्यवाई च्या बाता.
आपला देश म्हणजे सगळी वार्यावरची वरात झाली आहे. कोणी पण उठतो आणि दादा बनतो. या हरामखोरांचे सगळे लागेबांधे असतात इतरांबरोबर! साधी गोष्ट आहे, एकदा का माणसाला कळलं की आपण काही केलं तरी चालू शकतं, तो काहीही करू शकतो. त्यामुळेच गुन्हेगाराना आळा घालण्यापेक्षा, साध्या माणसाचे गुन्हेगारात रुपांतर होण्याला आळा घालणे आज काळाची गरज बनली आहे. बाकी तुमचा लेख आवडला.
ReplyDelete"प्रजासत्ताकदिन साजरा करताना नेमकी सत्ता कुणाची हा प्रश्न पडतो" हे तुमचे वाक्य भावले.
मित्रांनो, आपल्या भावनासुद्धा माझ्यासारख्याच आहेत. झालेल्या कृत्याविरूद्ध आवाज उठवलाच पाहिजे. म्हणूनच तर हा ब्लॉग लिहिला.
ReplyDelete