दाट धुक्याची दुलई दूर झाली आणि नयनरम्य अशा देखाव्यांनी डोळ्याचं पारणं फिटलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सदाहरीत जंगलातील असंख्य झाडं आपला नेहमीचा हिरवा रंग बाजूला ठेऊन विविध रंगांच्या छटा असलेली वस्त्र परिधान करून जणू निसर्गोत्सव साजरा करीत होती. सगळेच डोंगर पुष्पगुच्छ होऊन गेले होते. इतका विलोभनीय देखावा मी क्वचीतच पाहिला असेल. हिमालयाचा पर्वतमाथा पार करत आता आम्ही सखल प्रदेशाकडे पोहोचत होतो. बोमदिला, दिरांग, भालूकपॉंग अशा प्रदेशातून पुन्हा तेजपूर या असम राज्याच्या शहरात दाखल झालो ते ब्रम्हपुत्रेच्या साक्षीने.
- पूर्वांचलाची चित्र सफर भाग १
- पूर्वांचलाची चित्र सफर भाग २
- पूर्वांचलाची चित्र सफर भाग ३
- पुर्वांचलाची चित्र सफर भाग ४
- पुर्वांचलाची चित्र सफर भाग ५
- पुर्वांचलाची चित्र सफर भाग ६
- पुर्वांचलाची चित्र सफर भाग ७
- पुर्वांचलाची चित्र सफर भाग ८
- पुर्वांचलाची चित्र सफर भाग ९
No comments:
Post a Comment