03 March, 2019

OIC मध्ये पाकची गोची

ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) ही ५७ इस्लामी इस्लामबहुल देशांची संघटना आहे. संयुक्त राष्ट्रांच्या खालोखाल तिचे महत्त्व आहे, ते तिच्या आकारामुळे. चार खंडांतील तब्बल ५७ देश या संघटनेचे सदस्य आहेत. याआधी ती इस्लामी देशांची परिषद या नावाने ओळखली जात असे. जगभरातील तमाम इस्लामधर्मीयांच्या हिताचे रक्षण हे तिचे उद्दिष्ट. तथापि प्रत्यक्षात ती या धर्मीयांच्या दबावगटासारखे कार्य करते. तसेच आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक इस्लामधर्मीय देशांना तिच्याकडून भरभक्कम आर्थिक मदत वा रसद पुरवली जाते.

अबुधाबीत झालेल्या आयओसीच्या बैठकीत 'सन्माननीय पाहुणे' म्हणून प्रथमच भारताला निमंत्रित करण्यात आलं. आबुधाबीतील इस्लामिक कोऑपरेशनच्या बैठकीला सुषमा स्वराज दाखल झाल्याने पाकिस्तानला दणका बसला आहे. कारण पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी या बैठकीला धमकी दिली होती, की स्वराज या बैठकीला उपस्थित राहणार असतील तर पाकिस्तान बैठकीवर बहिष्कार टाकेल. मात्र त्यांच्या या धमकीला कोणी विचारले ही नाही. त्यामुळे त्यांची चांगलीच नाचक्की झाली आहे. वस्तूत: या संघटनेची स्थापना पाकिस्तानच्या पुढाकाराने केली गेली होती आणि त्यासाठी पाकिस्तानने पैसा ही ओतला होता. आता ओआयसी या पाकच्या घरातूनच त्यानाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. १९६९ मध्ये  मात्र पाकिस्तानच्या सांगण्यावरून मोरोक्को परिषदेचे भारताचे निमंत्रण रद्द झाले होते.

या परीषदेत “दहशतवाद हा अनेकांचे प्राण घेताना विविध प्रदेशांत अस्थिरता निर्माण करीत असून, त्यामुळे तो जगाला मोठा धोका आहे”, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी विशेष पाहुण्या म्हणून बोलताना सांगितले.

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी सांगितले, की दहशतवाद व अतिरेकवाद ही नावे  वेगळी असली तरी या ना त्या कारणाने त्यातून प्राणहानी होत आहे. धर्माच्या विकृतिकरणातून या दहशतवादाचा जन्म झाला असून, दहशतवादाचा मार्ग यशस्वी होतो असा गैरसमज झाला आहे. त्यातून त्याचा प्रसार होत आहे. सतरा मिनिटांच्या भाषणात स्वराज यांनी पाकिस्तानचा उल्लेख केला नाही. त्या म्हणाल्या, की आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व १३० कोटी भारतीय तसेच १८५ दशलक्ष मुस्लीम बंधूभगिनी यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत. आमचे मुस्लीम बंधूभगिनी हे देशाच्या विविधतेचे प्रतीक आहेत.

इस्लाम म्हणजे शांतता व अल्लाच्या ९९ नावांमध्ये हिंसाचाराला कुठेही थारा नाही. तसेच जगातील प्रत्येक धर्म हा शांतता, करुणा व बंधुत्वाचा पुरस्कार करणारा असून ज्ञान, शांतता, श्रद्धा व परंपरा यांचा पुरस्कार करणाऱ्या देशाची मी प्रतिनिधी असून, वेगवेगळे पोशाख, चवी, सांस्कृतिक व भाषिक वारसा अनेक पिढय़ा आम्ही जपला आहे. भारतातील लोकांनी विविध श्रद्धा व एकमेकांशी सुसंवादावर नेहमीच विश्वास ठेवला असे सुषमा स्वराज या बैठकीत म्हणाल्या.

ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) या फक्त इस्लामबहुल देशांच्या वार्षिक अधिवेशनासाठी भारताला तब्बल पाच दशकांनी निमंत्रण दिले गेले हे नरेंद्र मोदी सरकारचे मोठेच धोरणयश. पाकिस्तानने ओआयसी संघटनेला पत्र पाठवून सुषमा स्वराज यांना दिलेले निमंत्रण मागे घेण्याची विनंती केली होती ती फेटाळण्यात आली. भारत सरकारच्या परराष्ट्र नितीचं हे मोठं यश आहे.  

ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) ही ५७ इस्लामी इस्लामबहुल देशांची संघटना आहे. संयुक्त राष्ट्रांच्या खालोखाल तिचे महत्त्व आहे, ते तिच्या आकारामुळे. चार खंडांतील तब्बल ५७ देश या संघटनेचे सदस्य आहेत. याआधी ती इस्लामी देशांची परिषद या नावाने ओळखली जात असे. जगभरातील तमाम इस्लामधर्मीयांच्या हिताचे रक्षण हे तिचे उद्दिष्ट. तथापि प्रत्यक्षात ती या धर्मीयांच्या दबावगटासारखे कार्य करते. तसेच आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक इस्लामधर्मीय देशांना तिच्याकडून भरभक्कम आर्थिक मदत वा रसद पुरवली जाते.

अबुधाबीत झालेल्या आयओसीच्या बैठकीत 'सन्माननीय पाहुणे' म्हणून प्रथमच भारताला निमंत्रित करण्यात आलं. आबुधाबीतील इस्लामिक कोऑपरेशनच्या बैठकीला सुषमा स्वराज दाखल झाल्याने पाकिस्तानला दणका बसला आहे. कारण पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी या बैठकीला धमकी दिली होती, की स्वराज या बैठकीला उपस्थित राहणार असतील तर पाकिस्तान बैठकीवर बहिष्कार टाकेल. मात्र त्यांच्या या धमकीला कोणी विचारले ही नाही. त्यामुळे त्यांची चांगलीच नाचक्की झाली आहे. वस्तूत: या संघटनेची स्थापना पाकिस्तानच्या पुढाकाराने केली गेली होती आणि त्यासाठी पाकिस्तानने पैसा ही ओतला होता. आता ओआयसी या पाकच्या घरातूनच त्यानाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. १९६९ मध्ये  मात्र पाकिस्तानच्या सांगण्यावरून मोरोक्को परिषदेचे भारताचे निमंत्रण रद्द झाले होते.

या परीषदेत “दहशतवाद हा अनेकांचे प्राण घेताना विविध प्रदेशांत अस्थिरता निर्माण करीत असून, त्यामुळे तो जगाला मोठा धोका आहे”, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी विशेष पाहुण्या म्हणून बोलताना सांगितले.

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी सांगितले, की दहशतवाद व अतिरेकवाद  
ही नावे  वेगळी असली तरी या ना त्या कारणाने त्यातून प्राणहानी होत आहे. धर्माच्या विकृतिकरणातून या दहशतवादाचा जन्म झाला असून, दहशतवादाचा मार्ग यशस्वी होतो असा गैरसमज झाला आहे. त्यातून त्याचा प्रसार होत आहे. सतरा मिनिटांच्या भाषणात स्वराज यांनी पाकिस्तानचा उल्लेख केला नाही. त्या म्हणाल्या, की आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व १३० कोटी भारतीय तसेच १८५ दशलक्ष मुस्लीम बंधूभगिनी यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत. आमचे मुस्लीम बंधूभगिनी हे देशाच्या विविधतेचे प्रतीक आहेत.

इस्लाम म्हणजे शांतता व अल्लाच्या ९९ नावांमध्ये हिंसाचाराला कुठेही थारा नाही. तसेच जगातील प्रत्येक धर्म हा शांतता, करुणा व बंधुत्वाचा पुरस्कार करणारा असून ज्ञान, शांतता, श्रद्धा व परंपरा यांचा पुरस्कार करणाऱ्या देशाची मी प्रतिनिधी असून, वेगवेगळे पोशाख, चवी, सांस्कृतिक व भाषिक वारसा अनेक पिढय़ा आम्ही जपला आहे. भारतातील लोकांनी विविध श्रद्धा व एकमेकांशी सुसंवादावर नेहमीच विश्वास ठेवला असे सुषमा स्वराज या बैठकीत म्हणाल्या.

ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) या फक्त इस्लामबहुल देशांच्या वार्षिक अधिवेशनासाठी भारताला तब्बल पाच दशकांनी निमंत्रण दिले गेले हे नरेंद्र मोदी सरकारचे मोठेच धोरणयश. पाकिस्तानने ओआयसी संघटनेला पत्र पाठवून सुषमा स्वराज यांना दिलेले निमंत्रण मागे घेण्याची विनंती केली होती ती फेटाळण्यात आली. भारत सरकारच्या परराष्ट्र नितीचं हे मोठं यश आहे.  

आजपर्यंत पाकिस्तान आपल्यावर हल्ला झाल्यास आपल्यामागे ओआयसी आहे असा  बागुलबूवा नेहमी दाखवायचा त्या आघाडीवरही पाक आता पुरता उघडा पडला आहे.     

02 March, 2019

बुद्धीजिवी फिदायीन पाकिस्तानचं हत्यार

काल वीर अभिनंदन पुन्हा भारतभूमीवर परतला. हा वीर पाकिस्तानच्या ताब्यात असल्यापासून तो आता परतला तरी पाकिस्तानच्या प्ररचारतंत्राची सारी जबाबदारी काही भारतीय प्रसारमाध्यमं, तथाकथीत बुद्धीजिवी, पुरोगामी भामटे आणि केवळ मोदींना अपशकून करायचा म्हणून स्वत:चं नाक कापून घेणारे दिडदमडीचे राजकारणी  यांनी सांभाळलेली आहे. भारतातले हे अस्तनितले निखारे पाकिस्तानचा प्रचार पाकला हवा तसा करताना दिसत आहेत. ते आता भारतापुरते मर्यादीत न रहाता पाकिस्तानच्या टिव्हीवरच जास्त चमकू लागले आहेत. जवळ-जवळ युद्धजन्य स्थिती असताना आणि आपला एक सैनिक पाकच्या ताब्यात असताना हे लोक खोटा प्रचार करून भारत सरकारला दोन आघाड्यांवर लढायला भाग पाडत होते. श्रीनगरमध्ये अतिरेक्यांवर कारवायी करताना आपल्या भारतीय जवानांवर दगडफेक करणार्‍या शत्रूचीच भुमिका हे निच लोक बजावत आहेत.      

वीर अभिनंदनने शत्रूच्या ताब्यात असताना ज्या गोष्टी सांगायला स्पष्ट नकार दिला त्याच गोष्टी सर्व तपशीलांसहीत भारतातल्या टिव्हीवर आणि समाजमाध्यव्दारे सर्व भारतभर वेगाने पसरवल्या गेल्या. भारत सरकारने आपली कुटनिती वापरून जगभर नामोहरम केलेल्या  पाकिस्तानला याच लोकांनी मान वर करायची उसंत दिली. मग वीर अभिनंदन भारतात परतायला वेळ होऊ लागला. त्याला प्रताडीत करून त्याचा व्हिडीओ पाकिस्तानने प्रसारीत केला आणि आश्चर्य म्हणजे पाकपेक्षा तो भारतातच जास्त पाहिला गेला. ही पाकिस्तानची रणनिती आहे जी भारतातल्याच या घरभेद्यांनी सफळ संपूर्ण केली. दिड मिनिटापेक्षा कमी वेळाचा  असलेला हा व्हिडीओ अठरा वेळा कापून-जोडून असा तयारा केला आहे की पाकला हवा तो अर्थ त्यातून निघतो. असा व्हिडीओ हा पाकिस्तानच्या प्रचाराचा भाग आहे. तो व्हिडीओ व्हायरल करणे, #SayNoToWar सारख्या मोहिमा राबवणे, युद्धामुळे किती नुकसान होतं त्याची यादी देणं आणि एकूणच आपल्या सेनादलाच्या मनोबलाला धक्का पोचवणं हे पाकिस्तानचं काम भारतातलेच पाकिस्तानी मानसिकतेचे आणि सतत त्यांची तळी उचलणारे लोक करीत आहेत.

सामान्य भारतीयांच्या मनात संभ्रम निर्माण करणे, सैन्यदलांबद्दलचा आदरभाव कमी करणे, सरकारच्या कामात बिब्बा घालणे, मानवतेचा राग आळवणे, इअमरान खान किती सभ्य गृहस्त आहे त्याचे दाखले देणे, त्या हेतू शुद्ध आहे असे ठासून खेटे बोलणे, मुख्य म्हणजे पुलवामाची घटना विस्मरणात घालऊन आणि अझर महमुद व इतर आतंकवादी भारताला सोपवा ही मागणी बाजूला सारून सारं लक्ष वेगळ्याच मुद्द्यांवर भटकवणं अशी कामं करून आपल्या मनात गोधळ उडऊन देणे, विश्वास नाहीसा करणे ही या बुद्धीजिवी फिदायीन गटाची योजना  आहे आणि तेच आताच्या परिस्थितीत पाकिस्तानचं मुख्य हत्यार आहेत, आपणही ते बनायचं का त्याचा विचार करा. पोस्ट फॉरवर्ड करायच्या आधी सारासार विचार करा, त्याचा फायदा शत्रू घेणार नाहीना ते पहा, मुख्य म्हणजे लागलं हाताला केलं फॉरवर्ड असं करू नका. आपली ताकद कमी पडली की समोरच्याचा बुद्धीभेद करायचा ही पण एक रणनीती आहे त्याला आपण बळी पडून आपल्याचा विरूध्द लढूया नको. आजवर यालाच आपण बळी पडलो आहोत.

01 March, 2019

अभिनंदन... ‘अभिनंदन’

पाकिस्तानच्या F-16 फायटर विमानाला पाडून मिग-२१ भारतीय विमानाचा पायलट विंगकमांडर अभिनंदन परतत असताना त्यांचं विमान पाकव्याप्त काशमीरमध्ये क्षतीग्रस्त झालं. मोक्याच्या क्षणी सर्वोच्य कामगिरी बजाऊन हा जाबाज सैनिक पॅर्‍याशूटमधून उतरला तो पाकव्याप्त काशमीरमधल्या एका गावात. जखमी असूनही तिथल्या परिस्थितीचा आंदाज आल्याआल्या भारताचा जयजयकार करतानाच त्याने आपल्या जवळच्या महत्वपूर्ण कागपत्रांचा चोळामोळा करून तो गिळून टाकला आणि इतर कागद्पत्रं फाडून जवळच्या तलावात बुडऊन टाकली. भाराताच्या दिशेने धावत येत असताना ५०० मिटरवर पाक सैनिकानी त्याला ताब्यात घेतलं. पाकच्या ताब्यात असतानाही त्याचा रुबाब पहाण्यासारखा होता.  

मिग-२१ ही विमानं नेहरुंच्या काळात खरेदीकरण्यात आली होती आणि पाकची F-16 फायटर विमानं ही अमेरिकना बनावटीची अत्याधुनिक क्षेपणास्त्रधारी विमानं आहेत. मिग-२१ ने F-16 फायटर पाडणं हा फार मोठा पराक्रम आहे. तो या पठ्ठ्याने केलाच. पण पाकच्या ताब्यात गेल्यावरही असामान्य धैर्य दाखवलं. प्रत्यक्ष कारवायी आणि मनोवैज्ञानिक दबाव यात तो जराही कमी पडला नाही.

इकडे मोदी सरकारने आपलं कौशल्य पणाला लाऊन २४ तासांच्या आत अभिनंदनला भारतात परत पाठवण्याची घोषणा इमरान खानला पाकिस्तानच्या संसदेत करायला भाग पाडलं. अभिनंदन आज भारतात परत येत आहे. मला वाटतं यालाच ’नया भारत’ म्हटलं जातं. जो आता पाकड्यांसमोर झुकणारा नाही. भारत LOC  पार करणार नाही या भ्रमात आता कुणी राहू नये.  

यात विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे साठ वर्षं सत्ता गाजवणार्‍यांनी जुनाट मिग-२१ विमानं वायुसेनेला वापरायला भाग पाडलं आणि राफेलचा घोळ घालून ती योग्य वेळी विकत तर घेतली नाहीतच पण मोदी सरकार राफेलचा करार करून ती भारतात आणत असताना खोटे नाटे आरोप करून, न्यायालयीन विलंबाचा खेळ खेळून वायु सेनेला दुर्बळ बनवण्याच्या जाणून बुजून प्रयत्न चालवलेला आहे. अशी माणसं जैश-ए-मुहंमद पेक्षा जास्त खतरनाक आहेत. अस्तनीतले निखारे आहेत.
कधी शांततेचा बुरखा धारण करणारे, कधी पुरस्कार वापसी करणारे, कधी पुरोगामित्वाची बोबं ठोकणारे, तर कधी मानवतेच्या नावाखाली लपून कारवाया करणारे असे लोकच आपल्यातच राहून आपली प्रचंड हानी करणारे आहेत. यांचा बुरखाही टराटरा फाडण्याची हीच वेळ आहे.

भिम पराक्रम करून शत्रूच्या पंजातून परत येणार्‍या ‘अभिनंदन’चं अभिनंदन...! त्याच बरोबर कुटनितीक कारवायीतही पाकला नमवणार्‍या मोदी सरकारचंही अभिनंदन...!

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 
Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates