देशात विशेषतः महाराष्ट्रात सध्या स्वाईन फ्लूचा धुमाकूळ चालू आहे. त्याच्या उन्माद माजवणार्या बातम्या प्रसारमाध्यमातून ऎकायला मिळाताहेतच पण अशा वेळी मायबाप सरकार कडून सामान्य नागरीकांची जी अपेक्षा आहे ती मात्र पुर्ण होताना दिसत नाही. दहशत मग ती २६/११ ची असो की स्वाईन फ्लूची जनता निर्नायकी असल्यासारखी आहे. ज्यांनी नेतृत्व करायच ते हात वर करून बसलेत. लोक हवालदील झाले असताना राज्याला दिशानिर्देश देणारं सरकार नाही की कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. राज्य सरकार काही निर्णय घेणार नाही, मग निर्णय कुणी घ्यायचे तर स्वयंघेषीत सुभेदारांनी, जिल्हाधिकार्यानी, शाळाचालकांनी, महापालिका आयुक्तांनी आणि सरते शेवटी मुलांच्या पालकांनी. आम्ही फक्त मलीदा खाणार, अर्धवट बांधकाम झालेल्या पुलांची उद्घाटन करणार, नवीन टेंडरं काढणार, स्वतःची थोबाडं असलेले बोर्ड लावून अनाहूत सल्ले देणार आणि शहर विद्रूप करणार, नवीन टोल नाके उभे करणार, भुखंड हडप करणार्या या डुक्करांनीच दहशतीच्या स्वाईन फ्लूची लागण व्हायला दिली आहे, जेणे करून येत्या निवडणूकीत जनतेने महागाई विसरावी, आपली शेखी मिरवण्यासाठी याना दही-हंडी, गणेशोत्सव पाहीजे. सज्जनतेचे आव आणलेली यांची कटाआऊट मोठी आणि शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक शोधावे लागतात.
या सगळ्या सावळ्यागोंधळात एकेका सुभेदाराचं फावलय. एक दादा आपल्या जिल्ह्यातली शाळा-कॉलेजं बंद ठेवतो तर शाळांचे सुभेदार मनमानी निर्णय घेताहेत. एकाच रस्त्यावरची एक शाळा बंद तर दुसरी उघडी. मेडिकलवाले दामदुप्पटीने पैसे वसुल करून मास्क विकताहेत. लोक आता स्वाईन फ्लू विसरे पर्यंत एकच मास्क लावून फिरणार त्यामुळे स्वाईन फ्लू राहिला बाजूला पण दुसर्याच रोगाची शिकार होणार. पण एक आशेचा किरण दिसतो आहे वसई-विरारचा धडा राजकारण्यांनी विसरू नये. तोपर्यंत असे दादा, भाई, रावजी, पंत आजुबाजुला फिरकलेच तर जरा त्यांच्या तोंडावर खोका. प्रतिक्रीया पहा.
No comments:
Post a Comment