
स्वाईन फ्लू मुळे अचानक शहरांचं चित्र बदलत चाललं आहे. अगोदर पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचार्यांच्या तोंडावर आणि शस्त्रक्रिया विभागात दिसणारे मास्क आता सर्रास सगळ्यांच्या तोंडावर दिसू लागले आहेत पण त्याच्या तर्हा तरी किती ? सर्जिकल,एन 95, साधे, थर्मल पासून हात रूमाल, ओढण्या, पदर सगळच तोंडावर आलं आहे. बरं हे सगळं तोंडावर असलं तर ठिक आहे. गळ्यात, कपाळावर, नाका खाली, हातात. मास्क ताईता सारखे जवळ असले म्हणजे झालं. ज्या रुमालाने हात फुसणार तोच तोंडावर. या सगळ्या गडबडीत जीव जंतूंचं भांडार घेऊनच आपण फिरतो आहोत याच भान नसतं. कित्तेक लोक मास्क बाजूला करुन थुंकताना दिसले, शिंकताना दिसले. हेच मास्क आता रस्त्या रस्त्यावर पडलेले आढळतात. मास्क स्वच्छ पाहिजेत, रोज बदलले पाहिजेत, ते दुसर्याच्या संपर्कात य्रेता कामा नयेत. थोडक्यात मास्कची काळजी घेतली तर ते आपल्या आरोग्याची काळजी घेणार. असो, सद्या शिंप्यांची दुकान तेजीत आहेत आणि साठेबाजांची चलती आहे एवढं खरं.
how true
ReplyDeleteखरय. मास्क लावण्या पेक्षा काळजी घ्यावी. लोकां च्या खूप जवळ जाऊ नये. हस्तांदोलन टाळावे. प्रत्येक वेळी हात धुवूनच कांही खावे.शिंक आली तर तोंडावर रुमाल ठेवावा. मास्क वापरायचाच झाला तर रोज धुवावा अन वापरावा.
ReplyDelete