झि मराठीच्या ‘सारेगमप’ मुळे निलेश सर्वांच्याच परिचयाचा झाला असला तरी त्या आधीपासूनच संगीताच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्याने रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘द म्युझिशियन्स’ या केवळ वाद्यमेळ्याच्या कार्यक्रमात वादकांचे कसब पणाला लागते आणि इतर कलाकारांबरोबरच निलेशही आपली छाप या कार्यकमाद्वारे पाडतोच. ढोलक, ढोलकी, तबला, या बरोबरच जेम्बे हे आफ्रिकन वाद्यही निलेश तेवढ्याच ताकदीने वाजवतो. नुकताच दुरदर्शनच्या M2G2 या कार्यक्रमात निलेशने स्वतः तयार केलेलं एक वाद्य वाजवून दाखवलं. कोकणात, गोव्यात खासकरून वाजवलं जाणारं ‘घुमट’ हे वाद्य. त्यात बदल करून त्या घुमटाला एका बाजू ऎवजी दोन्ही बाजूला पानं लावून त्यातून कर्णमधूर नाद निलेशने वाजवून दाखवला. अशा प्रकारे परंपरागत वाद्यांबरोबरच सतत प्रयोगशील राहून नवीन काही करून दाखवायची वृती असणारा एक कलावंत म्हणूनही रसिकांना निलेश हवाहवासा वाटतो. आता निलेश म्हटलं की ढोलकीवरची थाप आणि त्याचं ते निखळ हास्य सहज नजरे समोर येतं.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 weeks ago
नरेंद्रजी, या माणसाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. मी जबरी फॅन आहे निलेशची. तुम्ही लिहिलेत ते अगदी यथार्थ, तो स्टेजवर असला की त्याच्याकडे लक्ष जाणारच जाणार. :)
ReplyDeleteहो, निलेश म्हणजे चैतन्याची झुळूकच...!
ReplyDelete