कुणी आभाळ लुटलं?
कसं पाणी ते आटलं?
काळ्या ढगांमध्ये कुणी
कोरं वारं हो फुकलं?
रितं आषाढाचं माथं
श्रावणात तीचं गत
कधी पडेल पाऊस?
तळं खोल खोल जातं
नाही उधाण वार्याला
नाही चिंब पावसाळा
पाणी पाणी होतं असे
नाही चित्त हो थार्याला
कधी बरसेल घन?
अंग निघेल न्हावून?
वरसाच्या बेगमीन
तळं फुगेल पाण्यानं?
नरेंद्र प्रभू
No comments:
Post a Comment