कसे हास्य फुलते हे !
काट्यातून उमलत जाते
वेदना आत लपलेल्या
विसरून मन तूझे गाते
उव्देग तिक्ष्णसा होता
विनयाने ढाल तूझी ती
त्या क्रोधालाही विझवी
निमिषात मन ऋजू होई
जो सर्व हलाहल पचवी
तो कंठ कुणी तूज दिधला ?
शिवशंकर गात्रा मधला
तूज सहज साध्य असलेला
ऋजूता अशी हृदयाची
मी कशी साध्य करू आता?
मार्दवात तो भिजलेला
तू धरशील का कर माथा ?
नरेन्द्र प्रभू
No comments:
Post a Comment