आनंदाच्या हिंदोळ्यावर
नाचत विहरत जातो
देश-विदेशी सफर करूनी
विश्वात्मक होतो
सहल अनोख्या जगताची ती
’ईशा’ संगती होते
तृप्त मनाने अन् नेत्राने
किती पाहूसे होते
‘आत्मा’नंदे वाटेवरती
स्वच्छंदे फिरताना
भव्य हिमालय, अथांग सागर
वन वन न्याहाळताना
जीवनामधले ते सुंदर क्षण
मंतरलेल्या घटका
आठवता जरी पुन्हा एकदा
तिथल्या रंगीत वाटा
आयुष्याचे मोल वाढते
करता देशाटन
नवे मित्र अन् नवे सोबती
ती एक साठवण
नरेंद्र प्रभू
No comments:
Post a Comment