काय भाई सांगू? कसं हो सांगू?
मलाच माझी वाटे लाज
काही तरी होऊन गेलंय आज!
उगीच बोलूनी गोलो खान
उगीच डिवचला तव अभिमान
त्या रागाचा, त्या माजाचा
अंगावर मी ल्यालो साज
काही तरी होऊन गेलंय आज!
जरी लाजरा, झालो
धीट
घुरत राहिलो त्याला नीट
सेनेचा हा पोर कसा मी
विसरुन गेले रीतरिवाज?
काही तरी होऊन गेलंय आज!
सहज बोलले तसले मी
मलाच हरवुन बसलो मी
एक अनावर हासडली जादा
नाही चालला काही इलाज
काही तरी होऊन गेलंय आज!
अमीत यताची शाही थोर
लहान आहे माझा पोर
सत्तेसाठी धरतो हाता
नाही करणार पुन्हा माज
काही तरी होऊन गेलंय आज!
No comments:
Post a Comment