आज वपुंची एक गोष्ट ऎकली. ही आधी न ऎकलेली गोष्ट होती. भांडणाचे
क्लास घेणारे जे. पी. जोशी. वपंचं
निरिक्षण आणि त्यावर केलेले मिश्कील भाष्य, विनोद म्हणजे विरंगुळ्याची हमखास जागा
आहे. तेव्हा वपुंच्या कथाकथनाच्या कॅसेट मिळायच्या. कितीतरी गोष्टी अशाच
टेपरेकॉर्डर वर ऎकलेल्या. मग एकदा शिवाजी नाट्य मंदीरला त्यांना प्रत्यक्ष ऎकायचा
योग आला. तसं सामान्य व्यक्तिमत्व पण एकदा स्टेजवर उभे राहिले की ते सगळी सभा
भारून टाकत.
असंच एकदा बिर्ला मातोश्रीला ओशोंवर बोलण्यासाठी वपु येणार
होते. ती शहाण्णव सालची गोष्ट असावी. कार्यक्रमाची वेळ झाली तरी वपु लाले नव्हते.
सभागृह तुडुंब भरलेलं होतं. अर्धा पाऊण तास होवून गेला. लोक कंटाळले आणि अचानक वपु
आले. नेहमिच्या पोशाखात नव्हते. त्यानी रुग्णाचा वेश धारण केला होता. पण तो आवेश
नव्हता तर ते खरंच रुग्ण शय्येवरून थेट सभागृहात आले होते. ते सुद्धा रुग्णवाहिकेमधून.
आल्या आल्या वपुंनी सर्व श्रोत्यांची हात जोडून माफी मागितली आणि भाषणाला सुरूवात
केली. जे बोलले ते मनापासून बोलले. सगळं सभागृह स्तब्ध होतं. वपु प्रत्यक्ष शेवटचे
भेटले ते तेव्हाच. त्यांचा अनंताचा प्रवास सुरू झाला. पण ते असे पुन्हा पुन्हा
भेटत रहातात त्यांच्या कथांमधून, लेखनातून. कधी https://www.facebook.com/pages/Va-Pu-Kale/100839026670902?fref=ts या फेसबुक वर. वपु एक आनंद ठेवा
आहे.
No comments:
Post a Comment