13 October, 2014

प्रकाश बाबा आमटे - एक सर्वांग सुंदर चित्रपट



डिप्रेशन आलेल्या माणसाला औषधाशिवाय बरं करणारा हा चित्रपट आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. फक्त प्रचंड इच्छाशक्ती घेवून आनंदवनातून सात दिवसाचा खडतर प्रवास करून एका अरण्यात प्रकाश आणि मंदाकिनी हे डॉक्टर दाम्पत्य पोहिचतं
आणि निवार्‍यापासून सगळ्या गोष्टी स्वत:च्या हाताने उभरतं. पहिल्या दिवसापासून केवळ संघर्ष करीत आदिवासींना अपलसं करतं. त्या जंगलात जे जे म्हणून आजारी पडतात त्यांना आपल्या दिव्यस्पर्शाने उपचार करीत रहातं. मग त्यात माणसं. जनावरं. माकडं, साप, वाघ, अस्वलं हे सगळं आलं.  

नक्षलग्रस्त भागात केवळ मानव सेवा करीत असताना सरकारी बाबूगिरीचा फटकाही त्याना बसतो. पद्म पुरस्कार डावावर लावावा लागतो. साप विंचू अंगाखांद्यावर झेलत असताना कमालीची गरीबी पाहून पुर्ण अंग झाकणारे कपडेही डॉ. प्रकाश आमटे घालायचं सोडून देतात. आदिवासीची सेवा करताना, कितीतरी शस्त्रक्रिया करताना, प्रत्यक्ष धन्वंतरीचाच अवतार असल्या सारखे ते भासत राहातात.    वाघाच्या मृत्यू झाल्यावर ते मुलगा जावा तसा शोक करतात, सगळंच विलक्षण. असा जीता जागता माणूस आज आपल्यात प्रत्यक्ष आहे हे सत्य आहे. इथेच आपल्या महाराष्ट्रात, हेमलकसा या गावी. नतमस्तक व्हायचं हे अशांपुढे.

चित्रपट पहिल्या क्षणापासून प्रेक्षकांचा ताबा घेतो. नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांचा सहज सुंदर अभिनय. नाना तर कसलेला अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ताही. प्रकाश आमटेंची भुमिका नानाला समजावण्याचा प्रश्नच आला नसेल. आनंदवनात आणि हेमलकशाला जावून या माणसाने कितीतरी वेळा काम केलं आहे, आर्थिक मदत केली आहे.


वेगळ्या विषयावरचा चित्रपट असूनही तो कुठेही रेगाळत नाही की कुणावर आरोप करीत नाही. पहिल्या क्षणापासून प्रवाही असा हा चित्रपट प्रकाश आमटेच्या जीवनासारखा, प्रकाशा सारखा. आणि म्हणूनच प्रत्येकाने आवर्जून पहाण्यासारखा.
               


                            
 

3 comments:


  1. आज डॉ. प्रकाश बाबा आमटे हा सिनेमा पाहिला.. आज आपण कुठे आहोत, कसे जगत आहोत त्याची किंम्मत शुन्य आहे...दुसर्याचा आनंद काय असतो दुसर्यासाठी जगण्यात काय श्रीमंती असते ते अलिशान बंगल्यात राहुन BMW MERCEDES गाडीतुन फिरताना नाही हो समजणार...दिवसातुन एखादा क्षण तरी १ ते १० रु. मिळ्ण्यासाठी जे कष्ट करतात त्यांचासाठी विचार करुया.. अपोआपच आपल्या अनावश्यक गरजा कमी होतील.. समाजातील गरजुंना आपण मदत देउ शकु, स्वाभिमान देउ शकु,थोडासा आनंद देउ शकु, भिक नाही..पण आत्मविश्वास नक्कीच देउ... हा सिनेमा बघितल्यावर आपला जगणयाचा संपुर्ण द्रुष्टीकोनच बदलतो..तस नाही झाल तर तो बदलण्याचा प्रयत्न तरी करावा..एका गोष्ट मनाला सतत खुपत होती की मल्टीप्लेक्स मध्ये बसुन महागड्या चहा कॉफी आणि पॉप्कॉर्न खात दुसर्याची वेदना बघणारे डॉ.आमटे यांचे व्रत समर्पीतता काय हो जाणणार...किती विरोधाभास दिसतो ना...अर्थात हे मला जाणवले तुम्हाला पटेलच अस नाही.. पण मन विषण्ण झालं..डॉ.आमटे जगण्याची माझी प्रेरणा आहेत...

    Arundhati Madhusudan

    ReplyDelete
  2. परीक्षण छानच झालंय.

    ReplyDelete
  3. शेंडगे साहेब आभारी.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates