|
यावर आणखी एक मजला बांधायला प्रोत्साहन |
शहर किती आणि कसं बकाल करायचं याचे धडे घ्यायचे असतील तर गेली कित्तेक वर्षं मुंबई महापालिकेत सता भोगणार्य़ा पक्षाकडे पहावं लागेल. रस्ते, पाणी आणि नागरी सुविधांचं व्यवस्थापन किमान चांगलं ठेवून, शहरातील रस्त्यालगतच्या फुटपाथ( याला पादचारी मार्ग असा पर्यायी शब्द आहे. ) वरून नागरिकांना व्यवस्थीत चालता आलं पाहिजे एवढीही सेवा ज्या सत्ताधारी पक्षाला देता आली नाही ते आता या शहराची उरली सुरली झोप उडवायच्या मागे लागले आहेत. प्रत्येक गोष्टींमध्ये केवळ स्वत:चाच विचार करणार्या आडमुठ्या नेतृत्वाचे दशावतार गेले काही महिने आपण पाहतोच आहोत, त्यात आता या पुढच्या पिढीच्या वारसदारांनी मुंबईची दुर्दशा करायचा चंग मांडला आहे.
|
ही सुधारणा
|
इथे येणारा पर्यटक आणखी एक दिवस (खरं तर रात्र) थांबला तर महसुलात भर पडेल म्हणणार्य़ांना आणि उठसुट शिवरायांचं नाव घेणार्यांना महाराष्ट्रातले गड-किल्ले का दिसत नाहीत? पाच वर्षात एक किल्ल्याला जरी त्याचं पुर्वीचं रुप देता आलं तरी जगभरातील पर्यटकांचा ओघ या मराठी भूमीत वळल्याशिवाय रहाणार नाही. ते करायचं सोडून नाईट लाईफच्या मागे लागायचं म्हणजे अतीच झालं. असलेल्या लोकांना किमान सुविधा न देता ‘झोपडपट्टी वासियांना मोफत घरं’ असल्या भंपक आणि कधिही पुर्या न होणार्या घोषणा करून मुंबईत गर्दीला निमंत्रण धाडून हे शहर अधिक विद्रूप केलं गेलं आहे, आता झोपडीच्या वरच्या मजल्यालाही संरक्षण देण्याचं आश्वासन पुढील निवडणूकांवर डो:ळा ठेवून दिलं जात आहे. खरं तर झोपड्या कधी हटत नाहीत. तिथली माणसं इमारतीत रहायला गेली तरी पुन्हा त्या जागेवरची झोपडी तशीच असते. कायद्याच्या मर्यादा कुणीच पाळत नाही. “स्वाईन फ्लू हा हृदयविकार आहे आणि तो उष्णतेमुळे होतो आणि त्यावर उपाय म्हणून शहरात झाडं लावणार आहोत” अशी मुक्ताफळं उधळणारी व्यक्ती महापौर पदी आहे.
|
यांच्या लाईफचं काय? |
त्यांचे कर्ते-करविते ‘नाईटलाईफ’ चा गेम सुरू करण्याच्या मागे आहेत. प्रत्यक्षात आश्वासनपुर्ती करता आली नाही की नवनवीन क्लुप्त्या काढून पुढील निवडणूक जिंकायची असा धंदा आहे आणि जनहिताचं सोग आणून हे सोंगाडे आपल्याला झुलवू पहात आहेत. सोंगाड्यांच्या हाती सत्ता किती दिवस ठेवायची? मोकळ्या जागा व्यापणं आणि जनतेने दिलेल्या करातून ज्योत पेटवणं हेच कायते यांचं कर्यव्य आणि करून दाखवणं.
No comments:
Post a Comment