हे गान मराठी, रान मराठी
धुन मराठी आहे
जयकार मराठी, ललकार मराठी
अभिमान मराठी आहे
वासुदेव मराठी, भारुड मराठी
अभंग मराठी आहे
लावणी मराठी, पोवाडा मराठी
किर्तन मराठी आहे
हा ताल मराठी, ढोल मराठी
तुतारी मराठी आहे
जयगीत मराठी, शाहिर मराठी
डफ मराठी आहे
हे नृत्य मराठी, नाट्य मराठी
काव्य मराठी आहे
झंकार मराठी, हुंकार मराठी
दमदार मराठी आहे
ही नदी मराठी, गढी मराठी
गड मराठी आहे
सरदार मराठी, तलवार मराठी
गडी मराठी आहे
हा रंग मराठी, ढंग मराठी
भगवाच फडकतो आहे
राज्य मराठी, शिवराज मराठी
अधिराज्य
करीतो आहे
नरेंद्र प्रभू
२७/०२/२०१७
No comments:
Post a Comment