तसे इथे आम्ही
योगायोगानेच गेलो. गणपतीपुळ्याच्या सहलीवर असताना भाऊ जोश्यांच्या खानावळीत
जोवायला गेलो असताना आधी रहात असलेलं हॉटेल पसंत नसल्याने आम्ही चांगल्या
हॉटेलच्या शोधात होतो. त्या खानावळीच्या मागेच एका हॉटेलचा बोर्ड दिसल्याने बघूया
हे कसं आहे म्हणून तिकडे वळलो, चौकशी केली आणि खोली पसंत पडली. दुसर्यादिवशी दोन
दिवसांसाठी आम्ही या ‘योगायोग’मध्ये रहायला गोलो.
आदल्या दिवशी ज्या
हॉटेलचा बोर्ड पाहून आम्ही भाऊ जोश्यांच्या खानावळीमागे गोलो होतो तो बोर्ड
वेगळ्याच हॉटेलचा होता आणि आम्ही ‘योगायोग’ या प्रसाद कुलकर्ण्यांच्या होम स्टे
मध्ये खोली घेतली होती. आवारात शिरताच त्यांच रिसेप्शन होतं आणि ही गल्लत झाली पण
योगायोगाने ते होम स्टे उत्तमच निघालं. खोली उत्तम, माणसं चांगली, तिथे मिळणारी
न्याहरीही चवदार, मुख्य म्हणजे स्वच्छता आणि निसर्गाचं सान्नीध्य. दोन दिवस विरंगूळ्यासाठी
जाणार्याला आणखी काय हवं?
गणपतीपुळ्याच्या
गणपती मंदीरापासून दिडेकशे मिटरवर बॅंक ऑफ इंडीयाच्या बाजूलाच हे होम स्टे
असल्याने मंदीरात आणि समुद्र किनार्यावर हवं तेव्हा जाता येतं. अदबशीर सेवा अशी टॅग लाईन असलेलें हे होम स्टे खरोखरीच
तसं आहे. बाजूच्या खोलीत एका महिन्यात तिसर्य़ांदा आलेला विदेशी पर्यटक या सर्वावर
मोहर उठवत होता. मालक प्रसाद कुलकर्णी इतर हवी ती माहिती देण्यास तत्पर असतात.
कोकणात अशी सेवा मिळाली तर आणखी काय हवं? बहारदार निसर्गाची मजा लुटायला खाणं आणि रहाणं व्यवस्थित असेल तर ती मजा शतगुणीत होते.
No comments:
Post a Comment