माड पोफळीच्या बागा
साद घालतसे दर्या
शुभ्र पुळणीवरती
जरा विसावा घेऊया
तिथे जागे चंद्रकोर
शब्द नसे हा चकार
शांत शांत वारा वाहे
लाटा चंदेरी अपार
रेत हळवी पायाला
सांगे हळूच कहाणी
सय भारल्या दिसांची
कुजबुजते हो कानी
तारू विसावले आहे
जरा दमभरासाठी
किती आठवांची येते
मनी सागर भरती
इतक्यात वेडी लाट
लाट पायाशी खेळते
तुझ्या माझ्या आठवांच्या
रेघा किनारी मारते
परतून ओहोटीला
जातो काळोख मनाचा
लाटालाटांवर स्वार
झाला उन्मेष उद्याचा
No comments:
Post a Comment