६ वर्षांपुर्वीच्या
लडाखच्या फोटोंची आठवण फेसबूकने करून दिली आणि ही कविता सुचली.
असेल पडले असे
चांदणे
हिमात असतील निजले
पर्वत
शिखरावरती फडकत
असतील
रंग पताका निरोप
धाडीत
असेल किलबील करीत
बैसला
पक्षी निराळा
निळा-पांढरा
झाडावरती जीवन
हिरवे
जर्दाळूला शुभ्र फुलोरा
असेल बदलत पट
रंगांचे
निळे सरोवर सुवर्ण
मंडीत
असतील काहो सुडौल
बदके
लाटांवरती सुरेख
डोलत
देतो आहे जवान माझा
खडा पहारा
खिंडींमधूनी
असेल का हो कुणी
बोलला
शब्द सुखाचा माझ्यावाचूनी?
असेल बसला मित्र
ताशी तो
वाटेवरती लावूनी डोळा
असतील जमले सखे
तिथे रे
घेवून येतो अपुला
मेळा
नरेंद्र प्रभू
३१/०५/२०२०