25 October, 2010

आशेचा किरणसमाजात पैशाला आलेलं अवास्तव महत्व, त्यासाठी काय वाट्टेल ते करायची आणि कोणतीही हद्द गाठायची तयारी, भ्रष्टाचार हाच शिष्टाचार असल्यासारखं वागणं, दूसर्याची मालमत्ता घशात घालण्याची वृत्ती आणि सत्तास्थानाचा आपल्या वैयक्तीक फायद्यासाठी केलेला वापर अशा अनेक गोष्टी आपण अगदी रोजच्या रोज अनुभवत आहोत. राष्टकूल क्रिडा स्पर्धा संपल्या आणि त्या स्पर्धांमध्ये आपल्या क्रिडापटूंनी पदकांची कमाई केली असली तरी त्या स्पर्धांच्या निमीत्ताने झालेला प्रचंड खर्च आणि त्यात झालेला भ्रष्टाचार म्हणजे सामान्य करदात्यांच्या खिशात घातलेला हातच आहे. ती करदात्यांची लूटच आहे. लवासा सारख्या प्रकल्पांच्या अनधिकृत कामांकडे प्रथम डोळेझाक करायची आणि नंतर ती नियमीत करायची हा सत्तेचा गैरवापर आहे. याच्यावर अंकूश ठेवायचा ते सरकारच यात सामील झालं आहे. सगळीच शहरं बाधकाम व्यावसायीकांच्या दावणीला बांधली गेली आहेत. न्याय व्यवस्थेतही संबंधीत वकील गब्बर होत आहेत आणि तारीख पे तारीखबघत पक्षकारांच्या पिढ्या बरबाद होत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या कायद्याला धाब्यावर बसवून आपली पोतडी भरण्याच्या मागे लागले आहेत आणि कायद्याचे रखवालदार त्यांचीच चाकरी करताना दिसत आहेत. रोजच अशा प्रकारच्या बातम्या वाचून सुन्न व्हायला होतं आणि हळूहळू आपणही या बाबतीत कोडगे होत आहोत की काय असा प्रश्न पडतो. आपण संवेदनशिलता हरवून बसलो आहोत असं वाटायला लागतं. यावर उपाय काय? या सगळ्या विरुद्ध लढणारा अण्णा हजारें सारखा एखादाच असं वाटत असताना आजच्या लोकसत्ता मध्ये डॉ. गिरीश जाखोटिया  यांचा लेख वाचला  आणि एक आशेचा किरण दिसला. आपणही वाचा: समस्त व्यावसायिकांनो एक व्हा!

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates