(परमस्नेही सौ. रेखा भिवंडीकर आणि अरुण आंबेरकर यांचं ‘कलासिद्धि हे चित्र,
शिल्प प्रदर्शन पाहिल्यावर सुचलेलं गीत)
किती रुप रंगी, तुला पाहतो मी
आणिक अभंगी गात असे
अनंत आकार एकच उकार
तुझे निज रुप त्यात दिसे
तुझ्या या कळांना नाही रे उपमा
काय अनुपम साज असे
चौसष्ट कलांचा तुच अधिपती
विद्येचा सांगाती आद्य असे
देखणे ते रुप, रंग आणि रेषा
तुच परमेशा ठायी ठायी
अखंड व्यापशी कलासक्त मन
त्याची परिणीती आज होई
०१-०९-२०१५
नरेंद्र प्रभू
No comments:
Post a Comment