पारल्यातला दोन वर्षांचा निसर्ग सहवास संपवून आता जायचा दिवस जवळ येतोय,
इथल्या निसर्गाची आठवण निरंतर येत राहील.
प्राजक्ताची फुले सुगंधी
इथल्या वाटांवरची धुंदी
कधीच सरला इथला वावर
या वाटेवर या वाटेवर
धुळीत मस्ती करीती चिमण्या
डौलाने जणू फिरती राण्या
चालेल उद्याही खेळ बरोबर
या वाटेवर या वाटेवर
मधूनच उडती राघू राना
मारून भरारी लांब दूरवर
या वाटेवर या वाटेवर
शीळ सुरांची मंजूळ मैफिल
इथे गातसे सुरेल कोकीळ
बहरेल प्रेम ते आम्रतरूवर
या वाटेवर या वाटेवर
असतो इथल्या कितीक वेळा
धावेल उद्याही मेघ धरेवर
या वाटेवर या वाटेवर
येईल चिमणा पक्षी अवचीत
तरुशिखरावर बसेल ऎटीत
हसून करीन मी त्याचे स्वागत
त्या वाटेवर, त्या वाटेवर
नरेंद्र प्रभू
२७-०९-२०१५
No comments:
Post a Comment