हिर्यासारखा हिरवळीतला हवाहवासा गाव
टिपूर चांदणे अजून पडते, हलते आहे नांव
कशी कुणी अन कधी खोदली इवलीशी ही बाव
डोंगर कापीत कुणी काढला रस्ता इथला राव?
खळखळ
वाहे झरा येथला नाही त्याला ठाव
तळ्यात
डुंबत इथली कमळे हसत खेळती डाव
आनंदाने
आंबा डोले नाही त्याला हाव
स्वागत
करतो सकल जनांचे रंक असो वा राव
माड-फोफळी
चवर्याढाळीत म्हणती दिवा लाव
देवळातली
घंटा जागवी मनातला सद् भाव
धुक्यात दडला असे पहुडला चांदणं वेडा गाव
मनात हुरहुर, करतो काहूर हवाहवासा गाव
Khup chaan sir...
ReplyDelete