05 March, 2019

श्रीनगरमधली जमात-ए-इस्लामी ची बॅंकखाती गोठवली





  1. केंद्र सरकारने जमात-ए-इस्लामीवर पाच वर्षांची बंदी घातली
  2. संघटनेच्या नेत्यांना पकडलं
  3. ७० बैंक खाती सील केली गेली
  4. जमात-ए-इस्लामीवरच्या बंदीचा पीडीपीकडून निषेध
  5. महबूबा मुफ्ती कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरली




जम्मू-कश्मीरची कट्टरपंथी संगटना जमात-ए-इस्लामी केंद्रसरकारने बंदी घातली आहे.

पूर्व मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं म्हणणं आही की  ‘लोकतंत्र विचारों का संघर्ष होता है, ऐसे में जमात-ए-इस्लामी (जेके) पर पाबंदी लगाने की दमनात्मक कार्रवाई निंदनीय है और यह जम्मू कश्मीर के राजनीतिक मुद्दे से अक्खड़ और धौंस से निपटने की भारत सरकार की पहल का एक अन्य उदाहरण है। ‘जमात-ए-इस्लामी से भारत की सरकार इतनी असुविधाजनक नहीं है। कश्मीरियों के लिए अथक परिश्रम करने वाले एक संगठन पर प्रतिबंध लगा दिया गया है। क्या अब बीजेपी विरोधी राष्ट्र विरोधी हो रहा है?'

जम्मू-कश्मीर राज्यातल्या इतर दहशतवादी संघटनांना बरोबर घेऊन राज्यात जोरदार आंदोलन करायची तयारी ही संघटना करीत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

जमात-ए-इस्लामी एक इस्लामिक राजनीतिक पार्टी आहे.  जिची स्थापना १९४१ मध्ये झाली होती. आता त्याचे तीन तुकडे झाले असून ते - जमात-ए-इस्लामी हिंद, जमात-ए-इस्लामी-पाकिस्तान आणि जमात-ए-इस्लामी कश्मीर म्हणून ओळखले जातात. जमात-ए-इस्लामी हिंद सोडून अन्य दोन्ही संघटना केव्हाच दहशतावादी कारवायात सामिल झाल्या आहेत.

शनिवार या संघटनेची ७० बॅंक खाती जप्त करण्यात आली असून त्यात ५० कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा आहे. पोलिसांनी जमातच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेतलं असून दक्षिण कश्मीरच्या कुलगावमधल्या संगटनेच्या कार्यालयांना सीलबंद करण्यात आलं आहे आणि तिथल्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार ‘जमात-ए-इस्लामी’च्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरांवर धाडी घालून त्यांची संपत्ती आणि घरं सील केली गेली आहेत.

सर्जिकल स्ट्राईक जसा पाकिस्तानात जरुरी होता तसा तो भारतातल्या घरभेद्यांवरही झाला पाहिजे अशी देशभरातून मागणी होत होती तीच आता पुर्ण होत आहे. गेल्या अनेक दशकात दहशतवाद्यांचं केलेलं लांगूलचालन आणि देशाच्या पैशाने चालवलेले त्यांचे लाड आता बंद झाले असून त्याना वठणीवर आणायचं काम मोदी सरकारने हाती घेतलं आहे.


पाकिस्तानची इथली फौज नेस्तनाबूत करण्याचं काम नरेंद्र मोदींसारखा खमका पंतप्रधानच करू शकतो.

२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे ही एक कारण आहे.

04 March, 2019

श्रीनगरमधल्या घरभेद्यांची झडती




जम्मू काश्मीरमधील १८ फुटीरतावादी नेते आणि १५५ राजकीय नेत्यांची सुरक्षा जम्मू-काश्मीर सरकारने काढण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. याआधी केंद्र सरकारने हुर्रियत परिषदेच्या सहा नेत्यांची सुरक्षा काढली होती. यात मीरवाईज फारूखचाही समावेश होता. फुटीरतावादी नेत्यांना सरकारी खर्चाने सुरक्षा देणे हा राज्याचा साधनसंपत्तीचा अपव्यय होता, पणा गेली कित्येक वर्षं त्याना हा फुकटा फौजफाटा देण्यात आला होता. एसएसएस गिलानी, आगा सैद मोस्वी, मौलाना अब्बास अन्सारी, यासिन मलिक, सलीम गिलानी, शाहीद उल इस्लाम, झफर अकबर भट, नईम अहमद खान, मुख्तार अहमद वझा, फारूख अहमद किचलू, मसरूर अब्बास अन्सारी, आगा सैद अबुल हुसेन, अब्दुल गनी शाह आणि महंमद मुसादिक भट या फुटीरतावाद्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली. त्याचबरोबर सुरक्षेची गरज नसलेल्या १५५ राजकीय नेत्यांचीही सुरक्षा काढून घेण्यात आली. त्यात सरकारी सेवेचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केलेल्या शाह फैजल यांचा समावेश आहे. या सर्वांसाठी सुमारे एक हजार पोलिस आणि १०० वाहने वापरली जात होती.


भारताचं खाऊन पाकिस्तानचं गाणारे हे फुटीर सरकारी खर्चावर आजपर्यंत डल्ला मारत होते. या फुटीर वाद्यांच्या घरांची आता झडती घेण्यात आली. त्यात पाकिस्तानशी जोडलेली फोनची हॉट लाईन आणि इतर इलेट्रॉनीक साधनांचा सर्रास वापर केला जात होता याचा खुलासा झाला असून आता ती सर्व सामुग्री जप्त करण्यात आली आहे. अशा लोकांना सवलत देऊन हळूहळू आणखी एका पाकिस्तानची निर्मिती भारतातल्या पाकसमर्थकांनी केली आहे. असे हे समर्थक देशभर पसरले असून भारतातल्या अनेक संस्था, राजकिय पक्ष, स्वयंसेवी संघटना, नक्षल प्रभावीत क्षेत्रं, सरकारी नोकरी, विद्यापीठं अशा अनेक ठिकाणी त्यानी आपलं बस्तान बांधलं आहे.

मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून त्या सरकारने ही घाण साफ करायला घेतली असली तरी त्यांची मुळं खोलवर रुतली आहेत. अनेक ठिकाणी राजरोसपणे हे उद्योग सुरू असून राजकिय पक्ष आणि व्यक्तींचा त्याला पाठींबा आहे. हे लोकच पाकिस्तानची खरी ताकद आहेत, इथल्या Assets आहेत.   

श्रीनगरमधल्या घरभेद्यांची सुरक्षा काढली ही या साफसफाईची एक सुरूवात आहे. अजून बरंच काम बाकी आहे.       

03 March, 2019

सलीम


भूतानच्या सफरीवर आत्माराम परब मी आणि सलीम

सलीम भूतानमध्ये भेटलेला हा मित्र आपल्याला असा अकाली सोडून या जगातून निघून जाईल असं वाटलं नव्हतं. काल आत्माने ती बातमी सांगितल्यावर सलीम बद्दलच्या माझ्या भावना या कवितेतून.   

सलीम 

असा मित्र हा जेव्हा मिळता
मनी दिलासा किती हा लाभे
अन त्याचा तो हात सांडता 
मन पुन्हा ते धावे मागे

किती दिसांची साथ असे ती
तेव्हा नव्हती माहित मजला
जेव्हा जेव्हा समोरून तो आला
आणि मनास भिडला

आता या वळणावर माझा
हात सोडूनी निघून गेला
काळ असा हा पुढेच चाले
त्याच्यासाठी तिथेच थिजला 


नरेंद्र प्रभू

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates