06 August, 2010

लेहमध्ये ढगफुटीजम्मू काश्मीरातील लेह भागात काल गुरुवार मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या अनपेक्षीत ढगफुटीमुळे मोठी जीवित आणि वित्तहानी, तसच मालमत्तेचं नुकसान झालं आहे. श्रीनगर-लेह तसच लेह-मनाली राष्ट्रीयमहामार्ग बंद झाले असून लष्कराच्या सहा हजार जवांनांनी तत्काळ मदतकार्य सुरू केलं आहे. पुरामुळे अनेक घरे तसेच नदीवरील दोन पूल वाहून गेले आहेत. सीआरपीएफचा कॅम्प, भारत संचार निगमचं मुख्य कार्यालय यांना मुख्यता हानी पोहोचली असून विमानवहातूकही बंद आहे.
लडखमध्ये असे ढग जमा होतात पण ते बरसतातच असे नाही. हा फोटो माझ्या जुलै २००७ च्या सहलीमधला आहे. 
  
वर सांगितल्या प्रमाणे बातम्या प्रसारमाध्यमातून सांगितल्या जात आहेत. मात्र दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून दाखवण्यात येणारी छायाचित्र जुनी असून अजून पर्यंततरी मिडीया तिथे पोहोचलेला नाही. येत्या १४ ऑगष्टला आम्ही एकेचाळीसजण कारगील-लेह मार्गावर असणार आहोत. तो पर्यंत लेहकडे जाणारे दोन्ही रस्ते नक्की सुरू होतील. अजून आठ दिवसांनी तिथलं जनजीवन मार्गावर येईल यात शंका नाही. परवाच या सहलीसाठीची माहिती घेण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो तेव्हा कुणीतरी तिथे पाऊस पडतो का म्हणून विचारलं होतं. लेह मध्ये संपुर्ण वर्षात पाच मी.मी. एवढाच पाऊस पडतो आणि बर्‍याच वेळा तो बर्फवृष्टीच्या स्वरूपात असतो. नजिकच्या इतिहासात अशी घटना प्रथमच घडली असून नक्की काय झाले आहे त्याचा अजून नेमका अंदाज येत नाही. लेह मध्ये असलेले आमचे मित्र पद्मा ताशी, आशिक हुसेन यांच्याशी माझे मित्र आत्माराम परब (संचालक इश टुर्स) वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असून अजून संपर्क होत नसल्याने फोन सेवा सुरळीत सुरू झल्यानंतरच परिस्थितीचा अंदाज येऊ शकेल.

लडाख सारख्या दुर्गम भागात सहलीवर जाणं यामुळेच काहीअंशी नशीबावर अवलंबून असतं. सहलीत सहभागी झालेल्यांना एवढच सांगणं आहे की त्यांनी गडबडून जावू नये. दोन तीन दिवसात तिथल्या स्थितीचा अंदाज आल्यावर पुढील निर्णय घेता येईल. तो पर्यंत सर्वकाही मार्गावर याव म्हणून प्रर्थना.

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates