पुढचं प्रमुख आकर्षण होतं पँगगॉंग लेक. १४५ कि.मी. लांबीचं हे तळं (?) खार्या पाण्याचं आहे. भारत-चीन सीमेवरील या ठिकाणी जाताना नयनरम्य अशा प्रदेशातून आपली भ्रमंती होते. वाटेत लागतो छांगला पास. रस्त्यात याक, मरमऑट असे प्राणी दिसले.
आता पासेसना सरावलेले आम्ही कारु, शक्ती शक्ती अशी गावं पार करुन पँगगॉंग ला पोहोचलो. वाटेतलं बर्फ आता रोजचं झालं होतं. पण पासवर पोहोचल्यावर सैनिकांचं भेटणं आणि चहापान याने उबदार वाटायचं. वाटसरुच्या जीविताची काळजी आणि काही वैद्यकीय मदत लागली तर ती पुरवण्यासाठी हे सैनिक सदैव तयार असतात. त्याना पाहून त्यांच्या बाबतचा आदर आधिकच दुणावला. पँगगॉंगच्या काचेसारख्या स्वछ पाण्यात पाय देण्याची हिंमत होत नव्हती, एवढं ते थंड होतं. आत जाऊन लगेचच बाहेर आलो. पण सभोवताली जे सौंदर्य होतं त्याला तोड नाही. एवढ्या शांत धीरगंभीर वातावरणात आपण निसर्गाशी एकरुप होऊन जातो. निसर्गाशी तादात्म्य पावण्याचे असे क्षण आपल्या आयुष्यात फार कमीच येतात. नाही का ?
(अपुर्ण....) जायचय लडाखला ? चला.....
लेखकः नरेंद्र प्रभू
No comments:
Post a Comment